पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक बार्डोली मिटली, पण इतरांची वाट काय ? १७५ अटी अधिक टणक केल्या असत्या. परंतु स्वतःच्या स्वार्थत्यागाच्या सामर्थ्यावर शेतकऱ्यांचा एवढा दृढ विश्वास होता की, वल्लभभाई हे समेटाची भाषा बोलण्याला पुण्यास जात आहेत असे कळतांच, त्यांनी कोणत्याहि अपमानकारक अटी मान्य करून तडजोड करूं नये, अशाविषयीं रयतांनी महात्माजींजवळ निर्भीडपणे सांगितले की, “आम्ही आमची सगळी जिनगानी जरी वल्लभभाईंच्या स्वाधीन केली असली तरी आमची अब्रू कांहीं त्यांच्या हवाली केली नाहीं !” अर्थातच अब्रूला धक्का लागण्याजोगी कोणतीहि अट मान्य करण्यास हे सत्याग्रही तयार नव्हते. सारांश, ही सत्याग्रहाची मोहीम हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या चळवळींत. अत्यंत नमुनेदार अशीच मानली जाईल, आणि सत्याग्रह कोणी, केव्हां, कोठें, कशाकरितां आणि कशाप्रकारें करावा असा जेव्हा जेव्हां प्रश्न निघेल तेव्हां तेव्हां इतिहासकार उत्तम सत्याग्रहाचें नमुनेदार उदाहरण म्हणून बार्डोलीकडेच बोट दाखवितील. एक बार्डोली मिटली, पण इतरांची वाट काय ? १२ [ बार्डोलीचा सत्याग्रह कसा यशस्वी झाला तें वरील लेखांत नमूद झालें आहे. त्या तडजोडींत ठरल्याप्रमाणे चौकशी कमिटी नेमून तिचा रिपोर्ट बाहेर पडला आणि २२ टक्के वाढ झाली होती तीपैकीं ६ टक्के वाढ कायम राहून बाकीची वाढ रद्द झाली. अशा रीतीनें बार्डोलीच्या सत्याग्रहानें रयतांचे दर- सालचे १ लक्ष ३८ हजार रुपये वांचले. त्यावरून या लेखांत असा प्रश्न केला गेला आहे कीं, रिव्हिजन सेटलमेंटमध्यें जर अशा भरमसाट चुका होतात, तर जेथें बार्डोलीप्रमाणे सत्याग्रह झाला नाहीं तेथील रयतांनीं अन्यायानें वाढलेला सारा भूर्दंड म्हणून भरीत राहावयाचें कीं काय ? कुलाबा जिल्हा, आंबेगांव पेटा, सांगोला तालुका इत्यादि ठिकाणीं सारावाढीविरुद्ध अशाच तक्रारी होत्या; पण तेथला सत्याग्रह, खंबीर पुढाऱ्यांच्या अभावीं, टिकला नाहीं, पण तेवढ्यावरून सारावाढ न्याय्य मानावयाची की काय ? तेव्हां सरकारानें प्रत्येक ठिकाणी सत्या- ग्रहाचा कडेलोट होईपर्यंत ताणून न धरतां आपली रिव्हिजन सेटलमेंट पद्धतीच सुधारावी, नाहीं तर अनेक बार्डोल्या निर्माण होतील, असा इशारा या लेखांत दिला आहे. ] (केसरी, दि. १४ मे १९२९ )