पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध तोंड लागले. या चौकशीच्या मागणीच्या पाठीशीं सत्याग्रहाचे बळ उभं आहे याचा प्रारंभी सरकारला अंदाज करता आला नाहीं; किंबहुना नेहमीप्रमाणे स्वतःच्या अचाट शक्तीच्या घमेंडींत सरकारनें सत्याग्रहाचें बल साहजिकपणे तुच्छ लेखिलें. कारण आजपर्यंत किती तरी ठिकाणी शेतसाऱ्याची बेसुमार वाढ सरकारने केली होती आणि कांहीं ठिकाणी त्या वाढीविरुद्ध थोडीबहुत चळवळ उद्भवली तरी ती नोकरशाहीने आपल्या पचनी पाडली होती. अशा रीतीने ही बका- सुराची स्वारी आजपर्यंत एकेक बळी ग करून पुष्ट होत आल्याने केव्हां तरी आप- ल्यालाहि एखादा खळी भेटेल अशी त्यास कल्पनाच नव्हती. पण सरतेशेवटी बका- सुरास भीम भेटला आणि त्यापुढे त्यास_ नमतें ध्यावे लागले. बार्डोली तालुक्यांत वल्लभभाईनी जो सत्याग्रह सुरू केला तो यशस्वी होण्याला परिस्थिति तशीच अनुकूल होती. कारण सत्याग्रह यशस्वी होण्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तेथें उपस्थित होत्या; सत्याग्रहाचें क्षेत्र मर्यादित होते आणि ज्या- करितां सत्याग्रह करावयाचा तें गान्हाणंहि त्या क्षेत्रांतील बहुतेक सर्व रहिवाश्यांना सारखेच लागू होते. सत्याग्रहाची मागणी निश्चित स्वरूपाची होती व ती मान्य करण्यांत सरकारलाहि फारशी तोशीस लागण्यासारखी नव्हती. शिवाय सत्याग्रहाचें स्वरूप सनदशीर असून त्यांत इतर कोणत्याहि राजकीय अथवा सामाजिक भानगडींची भेसळ नव्हती. सारांश, सत्याग्रह कोणत्या परिस्थितीत करावा याविषयीं तात्विक दृष्ट्या जे कोणते नियम शास्त्रकारांकडून घालून दिले जातील ते सर्व या सत्याग्रहाच्या लढ्यांत पाळले गेले होते आणि म्हणूनच हा सत्याग्रह यशस्वी होणार अशी चिन्हें प्रारंभापासूनच दिसत होती. सत्याग्रहाचे नमुनेदार उदाहरण अशा रीतीनें या सत्याग्रहाला नैसर्गिक अनुकूलता असली तरी त्याच्या यशाचें खरें श्रेय सरदार वल्लभभाई यांच्या अघटित घटनाचातुर्याला, स्वयंसेवकां- च्या शिस्तवार परिश्रमाला, आणि सत्याग्रही शेतकऱ्यांच्या निधड्या छातीच्या स्वार्थत्यागालाच दिले पाहिजे. जो सेनापति युद्धाला प्रारंभ करण्यापूर्वी स्वपर- बळाबळाचा अंदाज बिनचूक करतो तोच विजयी होतो. वल्लभभाईनी बार्डोली तालुक्यांतील रयतांच्या निश्चयाची आणि सरकारी कामगारांच्या अदूरदृष्टीची जी अटकळ केली होती ती तंतोतंत खरी ठरली, म्हणूनच त्यास हें यश लाभले. पण त्या सर्वापेक्षां सत्याग्रही शेतकऱ्यांच्या दृढनिश्चयावर त्यांची जी भिस्त होती ती खरो- खरीच यथायोग्य ठरली. समेटाच्या वाटाघाटीचा इकडे धूमधडाका चालला होता तरी बार्डीलीच्या शेतकऱ्यांनी समेटाविषयीं यत्किंचितहि अधीरपणा दाखविला नाहीं. त्यांनी अल्पांशाने देखील जर आतुरता दाखविली असती तर काकदृष्टीच्या सरकारनें लगेच त्यांच्या उतावळेपणाचा फायदा घेतला असता आणि आपल्या