पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नवे वाचक दृष्टीसमोर ठेवून सामान्यतः त्या त्या विषयाचे धागेदोरे संगतवार जुळे- तील अशीच लेखांची निवड करावी लागली. महायुद्धाला आद्यस्थान अशा रीतीनें एकेका विषयाची विहंगम दृष्टीनें तरी पूर्णता व्हावी, या हेतूनें लेखांचा क्रम ठरवितांनाहि तेंच धोरण नजरेसमोर राखले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत घडलेली सर्वांत मोठी क्रान्ति कोणती असेल तर युरोपांतलें अलीकडे नुक- तेंच संपलेले महायुद्ध होय. यास्तव स्वाभाविकपणेंच या महायुद्धविषयक लेखांना प्राधान्य देण्यांत आले असून त्या विभागांत १९२५ ते १९४६ पर्यंतच्या २१ वर्षातले १९ लेख घेतले आहेत. त्या परराष्ट्रीय राजकारणाच्या बरोबरच इकडे स्वराज्य संपादनाचा लढा चालू होता. त्या लढ्यांतले धागेदोरे उकलण्याकरितां १९१२ पासून १९३७ पर्यंतच्या २५ वर्षातले १७ लेख निवडले आहेत. राज- कारणाच्या बरोबरीनेंच अलीकडे अर्थकारणालाहि महत्त्व आले याकरितां तिसरा विभाग अर्थशास्त्रविषयक लेखांनी सजविला आहे. केसरींतील इतर कोण- त्याहि विषयांपेक्षां अर्थशास्त्र विषयावरील माझे लेख सर्वात अधिक भरतील. तथापि तो विषय वाचकांना रुक्ष व कंटाळवाणा वाटणारा असल्याने या विषया- वरचे १० च लेख यांत घेतले आहेत. १९१३ पासून १९३१ पर्यंतच्या १८ वर्षी- तील लेखांतूनच ही निवड करण्यांत आली आहे. वर निर्दिष्ट केलेल्या तीन विभागांनीच २६४ पृष्ठे व्यापल्यामुळे ऐतिहासिक, साहित्तिक, धार्मिक व सांस्कृतिक, ग्रंथपरीक्षणात्मक, मृत्युलेखविषयक असा लेखांचा मोठा संकीर्ण विभाग हाताळावयाचा तसाच राहिला. त्यांतील कोण- ताहि एक विषय सुरू केला असता तरी तो या ग्रंथाच्या ठराविक पृष्ठसंख्येच्या मर्यादेंत बसूं शकला नसता. यास्तव नाइलाजाने ते सर्व विषय तूर्त स्थगित करून संपादकीय धोरणासंबंधाचे ४ लेख या ग्रंथांत घेतले आहेत. अशा प्रकारें या ग्रंथांत १ महायुद्ध व परराष्ट्रीय राजकारण, २ देशांतील राजकीय घडामोडी, ३ आर्थिक व्यवहार आणि ४ संपादकीय ध्येय धोरण हे चार प्रमुख विभाग समाविष्टं झाले न, हा लेखसंग्रह जर वाचकांना आवडला आणि उपयुक्त ठरला तर लेखसंग्रहाचा दुसरा खंड प्रसिद्ध करण्याचा विचार ठरवितां येईल; आणि त्यांत ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे लेख समाविष्ट होतील. या लेखसंग्रहांत कोणत्या विषयावरील किती लेख आले आहेत याचें येथ- वर दें सामान्य दिग्दर्शन झाले. आतां त्या लेखांची प्रकरणवार संगति कशी लावता येते आणि त्यांतील प्रत्येक लेखांतून कोणता बोध घ्यावयाचा आणि त्या त्या विभागाचा एकंदर निष्कर्ष काय, यासंबंधानें वाचकांना थोडीशी कल्पना यावी आणि ते लेख वाचण्याची उत्सुकता त्यांच्यांत जागृत व्हावी, यास्तव त्या लेखांचे एक प्रकारचें अनुबंध चतुष्टय थोडक्यांत सांगण्याचा विचार आहे.