पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमृतसरच्या वाटेतला टप्पा १६७ निर्णय करण्याचा अधिकार यापुढे त्या त्या प्रांतिक कौन्सिलांतील काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या हातांतच राहणार आहे. पूर्वीच्या कारकीर्दीत मध्यवर्ति मंडळाने दिल्लीत बसावें आणि स्थानिक परिस्थितीचा विचार न करतां नागपूर, मद्रास, लाहोर वगैरे ठिकाणी वाटेल ती फर्मानें पाठवावीत, असा उंटावरून शेळ्या हांक- ण्याचा प्रकार घडत असे. याकरितां प्रांतिक स्वायत्तता घ्या, अशी प्रतिसहकार- पक्षाची प्रथमपासून मागणी होती. ही मागणी साबरमतीच्या ठरावांत मान्य करण्यांत आली आहे. मध्यप्रांतांत दिवाणगिरी स्वीकारावयाची का नाही याचा निर्णय आतां मध्यप्रांतीय कौन्सिलर्सच बहुमतानें करतील; त्यांत मद्रासच्या अगर मुंबईच्या सभासदांनी नसता लांडा कारभार करण्याचे कारण नाही. अर्थातच प्रत्येक गोष्टींत स्थानिक परिस्थिति ज्यांना पूर्णपणे अवगत आहे त्यांच्या शिरावरच निर्णय ठरविण्याची जबाबदारी पडल्याने दुसऱ्याच्या नांवाने चरफडत बसण्याचे प्रसंगहि यापुढे येणार नाहीत. या दृष्टीने पाहतां हे प्रांतिक स्वायत्ततेचें तत्त्व या कारखान्यांत स्पष्टपणे समाविष्ट झालें हाहि एक प्रतिसहकारपक्षाचा मोठाच विजय होय. रिफॉर्म्स अॅक्टचा शक्य तितका फायदा घ्या थोडक्यांत सांगावयाचें म्हटल्यास साबरमतीच्या या तडजोडीनें रिफॉर्म्स ॲक्टाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. रिफॉर्म्स हे थोतांड आहे व कौन्सिले ही ‘मायाग्र्हें’ आहेत ही वेदांती भाषा बंद पडून दिवाणगिरींत तथ्य किती आहे याचे निरीक्षण करण्याइतकी व्यवहारदक्षता दिसू लागली. यापूर्वी जरी तोंडाने ' कौन्सिल मिथ्यात्वाचा' जप चालला असला तरी हातून घडणाऱ्या प्रत्येक कृतीवरून 'कौन्सिलसयत्व'च प्रस्थापित होत होतें. तथापि ही तडजोड मान्य झाल्यास असहकारितावाद्यांना यापुढे असला चोरटा व्यवहार ठेवण्याचे कारण राहणार नाही, हा कांहीं लहानसहान फायदा नव्हे. तोंडानें आजन्म ब्रह्मचर्याची महती गात असतां, पांचसात पोरांचें लेंढार मागे लागलेले असावें, आणि धड संसारहि नाहीं व वड परमार्थहि नाहीं अशी 'इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः ' अशासारखी स्थिति व्हावी, त्यापेक्षां, होय, मी संसारी आहे अशी कबुली देऊन तो संसार तरी 'नेटका' करण्याच्या मार्गास कां लागूं नये ? साबरमतीच्या तडजोडीनें द्विदल पद्धतीच्या नरडीला नख लावण्याची वृत्तीहि चुकीची टरविली जात असून, या द्विदल पद्धतीत देखील जर स्वाभिमान कायम राखून जनतेचें हित साधतां येत असेल तर तें साधावें अशी अनुज्ञा दिली जात आहे. स्वराज्याच्या संपादना- पेक्षांहि द्विदल पद्धतीचा नायनाट करणें हेंच जणुं काय आपलें मुख्य ध्येय आहे, अशी जी कित्येकांची भ्रामक समजूत झाली होती तिला या करारनाम्यामुळे चांग- लाच अर्धचन्द्र मिळाला असून द्विदल पद्धतीचा उपयोग करून घेण्याची ज्याच्या