पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध झाला. कानपुरचा ठराव व साबरमतीचा ठराव या दोहोंत अशाच प्रकारचा भेद आहे. कानपुरचा ठराव असे म्हणत होता की, रयतेचें कल्याण-अकल्याण कांहींहि होवो दिवाणगिरी स्वीकारावयाची नाही, साबरमतीचा ठराव असे बजा- वीत आहे की, रयतेचें कल्याण करण्याची खरी सत्ता दिवाणांच्या हाती येत असेल तर दिवाणगिरीच्या फंदांत पडा नाहींतर त्या फंदात पडूं नका. हा इशारा ठीक आहे; पण यावर " होय, दिवाणगिरी स्वीकारल्याने रयतांचें किती तरी कल्याण करतां येतें" असा जबाब आल्यास दिवाणगिरीवरचा बहिष्कार अजिबात उठतो व तो तसा उठावा हाच तर या तडजोडीचा हेतु आहे. प्रतिसहकारपक्षाचा हा विजय पाहून ज्यांच्या मस्तकांत तिडीक उठली आहे असे कांही कट्टर शिरोमणी यावर अशी मल्लिनाथी करीत आहेत की, दिल्लीच्या मध्यवर्ति कारभारांतहि जबाब- दारीच्या तत्त्वाचा रिघाव झाल्याशिवाय प्रांतिक दिवाणांच्या हाती खरी सत्ता येतच नाही. याकरितां करारनाम्यांत तसे स्पष्ट शब्द नसले तरी याचा तसा अर्थ समजून दिवाणगिरीवरचा बहिष्कार कायमच आहे असे समजावें ! पण हा शुद्ध बाष्कळपणा होय. करारनाम्यांतला कोणता शब्द कोणत्या उद्देशानें घातला आणि जो शब्द त्यांत समाविष्ट केला नाहीं, तो कां केला नाही, याची माहिती साबर- मतीस वादविवादाच्या वेळी हजर असणाऱ्याला जशी असेल तशी चारशें मैलां- वरून तर्कट रचणान्यांस असूं शकणार नाही, हे लक्षांत ठेवून वाचकांनी सरळ व स्पष्ट अशा करारनाम्यावर भलताच अर्थ लादण्याच्या या कपटजालांत न सांपड- ण्याची सावधगिरी ठेवावी. करारनाम्यांत अमुक एक अट नमूद करावी असे मनांत आले असतें तर तडजोडीचा मसुदा तयार करणाऱ्यांना ते शब्द त्यांत दाखल करतां आले नसते असं नाहीं; पण ज्या अर्थी तसले कांहीं शब्द त्यांत घातले नाहीत त्या अर्थी ते आपल्या पदरचे घालून अर्थाची ओढाताण करण्याच्या भानगडीत पडूं नका असेच असल्या अहंमन्यांस बजावून ठेवले पाहिजे. प्रांतिक स्वायत्तता मिळाली दिवाणगिरी स्वीकारण्यास परवानगी देण्यापूर्वी तिजवर फारच कडक बंधनें घातली गेली आहेत हे खरें. तथापि मुलानें 'मी मुळींच विवाह करून घेत नाहीं असे म्हणणें, आणि जरत्कारूसारख्या अशक्य कोटीतल्या वाटणाच्या अटी घालून का होईना, पण विवाहाला संमति देणे, या दोहोंत जितकें अंतर आहे तितकेंच कट्टरांचा बिनशर्त बहिष्कार आणि साबरमतीचा सशर्त बहिष्कार या दोहोंत अंतर आहे. जरत्कारुनें अशक्य मानलेल्या अटी पूर्ण करणारा वस्ताद जसा त्याला भेटला तसाच कोणी खंबीर दिवाण पंडितजींनाहि भेटणार नाही असे नाही. शिवाय कानपुरच्या व दिल्लीच्या ठरावांत दुसरा एक मोठा भेद आहे तो असा की, दिवाणगिन्या वा अन्य जागा स्वीकारणे अथवा न स्वीकारणे याचा