पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमृतसरच्या वाटेंतला टप्पा १६५ बजेटहि पास करावयाचें नाहीं असा काँग्रेसचा ठराव कडकडीत बहिष्कारवादी होता. साबरमतीच्या ठरावांत असेम्ब्लीच्या ठरावांत असेम्ब्लीच्या मागणीला -सरकारकडून उत्तर मिळणें न मिळणे हा विचार गौण ठरून तो अजिबात सोडून देण्यांत आला आणि प्रांतिक सरकारांत दिवाणांच्या हाती खरोखरीची सत्ता असते का केवळ नामधारी सत्ता असते या विचाराला प्राधान्य येऊन जेथें दिवा- ●णांना भरपूर सत्ता गाजवितां येत असेल तेथें दिवाणगिया खुशाल स्वीकाराव्यात असे सांगण्यांत आलें. बरें, दिवाणांना भरपूर सत्ता मिळणे याचा अर्थ रिफॉर्म्स अॅक्टांत कांही दुरुस्ती करून दिवाणांना नवे अधिकार देणें असाहि नसून रिफॉर्म्स ॲक्टांतच जी सत्ता दिवाणांच्या हाती असावी असे म्हटले आहे, पण कित्येक अरेरावी गर्व्हनर जी सत्ता त्यांस उपभोगूं देत नाहीत, तेवढीच सत्ता पूर्णत्वानें गाजवितां येणें असा समजावयाचा आहे; आणि रिफॉर्म्स अॅक्टानें जेवढे अधिकार -दिवाणांच्या हाती दिले आहेत तेवढे त्यांस अविच्छिन्न वापरूं द्यालना असे विचारलें असतां कोणता सनदशीर गव्हर्नर निदान उघड रीतीनें तरी त्यास नकार देऊं शकेल ! अर्थातच या प्रश्नाला होकारार्थी उत्तर येतांच, काँग्रेसची अट पूर्ण झाली असे समजून दिवाणगिरी स्वीकारण्याचा मार्ग खुला झाला, असे मानून चालावें असे साबरमतीच्या करारांत ठरलें आहे व त्याची बजावणी होणें म्हणजेच प्रति- -सहकारपक्षाचे धोरण स्वीकारणे नव्हे काय ? प्रतिसहकारवादी असे केव्हांच म्हणत नव्हते व म्हणणारहि नाहींत कीं, गव्हर्नरसाहेबांनी दिवाणांच्या हाती काडीइतकीहि सत्ता ठेवली नाहीं तरी लोचटपणानें नामधारी दिवाण होऊन राहावें. परंतु दिवाणांच्या हाती खरी सत्ता असो वा नसो, दिवाणगिरीचा विचारच करावयाचा नाही असला जो कडकडीत बहिष्कार घालण्यांत आलेला होता, तो दूर होऊन त्याच्या जागी सयुक्तिक व मर्यादित बहिष्कार जरी आला आणि व्यवहारतः दोहोंची फलनिष्पत्ति सारखीच झाली तरी या दोहोंत तत्त्वतः फारच मोठें अंतर आहे आणि याकरितांच निष्कारण बहिष्काराच्या जागीं सकारण -बहिष्कार आला तरी तो मोठाच विजय मानला पाहिजे. प्रतिसहकार पक्षाचाच हा विजय आहे मीमांसाशास्त्रांतली एकदोन उदाहरणे घेतल्यास हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. हिंदुधर्मशास्त्रकारांनी सगोत्र विवाह निषिद्ध मानला आहे व त्यास कांहीं- एक कारण दिले नाहीं. मार्गच नाहीं. पण त्याच त्यामुळे या निषेधांतून बाहेर पडण्यास शास्त्रकारांनी एकुलता एक मुलगा दत्तक देऊं नये असे सांगून त्यापुढे 'तो स्वतःच्या वंशवृद्धीस पाहिजे' असें कारण नमूद केले आहे; त्यामुळे हा निषेध मर्यादित होऊन आपल्या वंशवृद्धीची पर्वा न धरतां एखाद्यानें एकुलता एक मुलगा दत्तक दिल्यास तो दत्तक रद्द ठरेनासा