पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमृतसरच्या वाटेतला टप्पा १६३ मारतां प्रतिसहकारपक्षाच्या धोरणावर त्याचें खापर फोडावयाचें आणि तेवढ्या- वरच आपल्या मनाचें कसेंबसें समाधान करून घ्यावयाचे, असा आत्मवंचनेचा कार्यक्रम कांही दिवस चालला. पण अशी आत्मवंचना सतत चालू राहणे शक्य नसल्यानें पंडित मोतीलाल हे तिच्यांतून सुटण्याचा मार्ग शोधूं लागले आणि साबरमतीची तडजोड हे त्या शोधाचेंच फळ होय. यांत हारजित कोणाची ? प्रतिसहकारपक्षाचे जे पुढारी पंडितजींच्या व महात्माजींच्या निमं त्रणावरून साबरमतीस गेले ते कांहीं प्रतिपक्षावर मात करण्याच्या वैय- क्तिक स्वार्थबुद्धानं गेले नव्हते. राष्ट्रीय सभेत देशांतील सर्व समंजस पक्षांची एकी व्हावी आणि राष्ट्रीय सभेचें सामर्थ्य बळावत जाऊन सुधार णेचा पुढला हता शक्य तितका लवकर संपादितां यावा, अशी त्या पक्षाची महत्त्वाकांक्षा आहे व राष्ट्रीय सभेत अशी जूट होण्यास मध्यंतरींचें अनैसर्गिक धोरण सोडून अमृतसरचें धोरण काँग्रेसने स्वीकारावें असे प्रतिसहकार- पक्षाचें मत आहे. अर्थातच या धोरणांत सुधारणांचा शक्य तितका उपयोग करून घेणे व त्याकरितां दिवाणगिया व तत्सम जागा स्वीकारणे, या गोष्टी अनुषंगानेंच येतात. हे त्याचे तत्त्व अढळ असल्याने तडजोडींत आपल्या या धोरणाला बाधक अशी अट कांही झाले तरी पत्करावयाची नाही आणि शक्य झाल्यास प्रतिपक्षाला आपल्या मार्गातील एक एक पायरी चढावयास लावावयाची असा विचार साबर- -मतीस जातांनाहि कायमच होता. यामुळे तडजोडीविषयीं जो वादविवाद झाला त्यांत स्वराजिस्ट प्रतिपक्षी किती पुढे येऊं शकतील येवढेच त्यांस पाहावयाचें होतें. पंडित मोतीलाल यांनी प्रतिसहकारपक्षाचें सर्वच धोरण मान्य करून दिवाण- गिया स्वीकारावयास बिनशर्त संमति दिली असती तर ती प्रतिसहकारपक्षास · नको होती असें नाहीं आणि तशी सोळा आणे कबुली पंडितजींकडून प्रतिसहकार- योग्यांना घेतां आली नाहीं; म्हणून साबरमतीस ठरलेल्या तडजोडींत प्रतिसहकार- पक्षाचा जय झाला नाहीं असेंच जर कोणास म्हणावयाचें असेल तर त्याच्याहि इच्छेच्या आड आम्हीं येऊं इच्छित नाही. परंतु कानपूरच्या काँग्रेसच्या आधीपासून स्वराज्य- पक्षानें ज्या वल्गना केल्या आणि स्वतःचा मिथ्याचार चालूच असतां आपले धोरण निर्भेळ अडवणुकीचेंच आहे असा जो डंका वाजविला आणि त्यास अनुसरून कानपूर येथील राष्ट्रीय सभेच्या बैठकीत व दिल्लीच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीत जे ठराव केले, त्यांच्या दृष्टीने पाहतां साबरमतीच्या तड- जोडींत स्वतःचें धोरण कोणी राखलें, कोणीं सोडलें, कोणी जिंकलें व कोण हरला याचा निर्णय वाचकांनाच आपल्या मनोमनी करतां येईल व तसा त्यांनी करावा.