पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध वळीच्या गाडीनें अमृतसरच्या वाटेंतला एक टप्पा गांठला, असें या लेखांत म्हटलें आहे. ] साबरमतीची तडजोड सहा महिन्यांपूर्वी मध्यप्रांताच्या कार्यकारी मंडळांत ना. तांबे यांची नेमणूक झाल्या वेळेपासून राष्ट्रीय सभेच्या राजकीय वातावरणांत जे प्रचंड वादळ उठले होतें तें आतां शांत होण्याच्या बेतांत आलेले दिसत आहे. गेल्या आठवड्यांत साबरमतीस प्रतिसहकारपक्षाचे पुढारी आणि स्वराजिस्टांचे अग्रणी पंडित मोतीलाल नेहरू यांच्यामध्ये जो करारनामा झाला त्यावरून या वादळाचा जोर संपला असून हवा शांत होत चालल्याचे स्पष्ट लक्षण दिसते. वादळ शांत झाल्या- बर देखील त्या वादळानें उठविलेली धूळ जागच्याजागी बसण्यास आणि आकाश स्वच्छ होण्यास कांहीं काळ जावा लागतो, त्याचप्रमाणे या राजकीय वादळांतीलाई शाब्दिक धूळ कांही दिवस उडत राहून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नेत्रांना त्रास देत राहील व त्या धुळीने भरलेले डोळे स्वच्छ होण्याला अवकाश न मिळाल्याने कित्येकांना हे झाले काय याचाहि लवकर नीटसा बोध होणार नाहीं; परंतु हे वादळ पूर्ण शांत झाल्यावर त्यांना असेंच आढळून येईल की, राजकारणाची गाडी मध्यंतरींच्या अडथळ्यास न जुमानतां अमृतसरच्या वाटेंतला एक एक टप्पा गांठींत अमृतसरच्या जवळपास येऊन पोहोंचली आहे. " प्रतिसहकारपक्ष व स्वराजिस्ट यांच्यामध्ये ज्या अटींवर साबरमतीस तड- जोड झाली त्याचें सूक्ष्मपणें निरीक्षण केल्यास आम्ही म्हणतों याचें प्रत्यंतर कोणा- सहि खात्रीनें पटेल. कायदेमंडळांत प्रवेश करण्यास राष्ट्रीय सभेची अनुज्ञा मिळाल्या वेळेपासून स्वराज्यपक्षानें कायदेमंडळांत आपले धोरण कसे ठेवावें, हा बादाचा मुख्य प्रश्न होऊन बसला. कौन्सिलांत जाऊन देखील असहकारिताच करावयाची असा पहिला बाणा होता; पण त्यास " आम्ही येथें सहकारिता कर- ण्यास आलो आहों" असें म्हणून पंडित मोतीलाल यांनींच पहिला हरताळ फासला. त्यानंतर स्वराज्यपक्षाच्या अनेक सभांतून जे ठराव होत गेले त्या योगानें पहिलें शुद्ध अडवणुकीचें तत्त्व सुटत जाऊन पंडितजींनी स्कीन कमिटीवर स्वतः जागा पत्करण्यापर्यंत सहकारितेची मजल नेली; तथापि आपण असहकारितेच्या क्षेत्रांत आहों व तिची मर्यादा आपण उल्लंघिली नाही असा बहाणा चालूच होता. ना. तांबे यांच्या नेमणुकीनें जी खळबळ उडाली तिच्या योगानें निद्राश्रमांत असलेले कित्येक स्वराजिस्ट पूर्ण जागे झाले आणि त्यांनी हा नैसर्गिक ओघ थांबवून त्यास परत असहकारितेच्या गिरिशिखरावर चढविण्याचा प्रयत्न चालविला ! या खटा- टोपांत कोणासहि यश येणें शक्य नव्हतेंच; तथापि आपला हा अनैसर्गिक हेका मोडावयाचा नाही आणि त्याच्या अपयशाचें पाप स्वतःच्या दुराग्रहाच्या माथीं न