पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मतवाल्यांनी असले दुधारी राज्ययंत्रच पुढे चालू ठेवावे असे म्हटले असून दुपाती राज्यव्यवस्थेशिवाय हिंदी जनतेला जबाबदार राज्यपद्धतीचें शिक्षण देतां येणें शक्य नाही असाहि आपला अभिप्राय नमूद करून ठेवला आहे ! द्विदल पद्धति अपेशी कां ठरली ? अल्पसंख्याक सभासदांचे असे मत आहे कीं, हल्लींच्या कायद्याने निर्माण केलेल्या दुचाकी राज्यशकटाचा बोजवारा उडाला असून हा गाडा सुरळीत चाल होण्याला त्याची रचनाच आमूलाग्र बदलली पाहिजे. सध्याची चाकें परस्परांना साहाय्यक होत नसून ती एकमेकांवर घर्षण पावतात व त्यांतून प्रसंगवशात् ठिण- गीहि पडते. शिवाय या राज्यशकटाचा इतका कर्णकटु आवाज निघतो की, त्याला नुसतें तेल माखून त्याचा हा कर्कश ध्वनी बंद होणार नाही. त्यांतील चाके, कणा, जूं वगैरे सगळेंच साहित्य नवीन प्रकारचें बनविले पाहिजे. डॉ. सप्र प्रभृतींच्या मतें द्विदल राज्यपद्धति अपेशी ठरण्याची कारणें मुख्यतः पुढे नमूद केल्या प्रकारची आहेत. ( १ ) एका म्यानांत दोन सुन्य राहू शकत नाहीत हा नैसर्गिक नियमच या अनुभवानें पुन: प्रस्थापित झाला आहे. ( २ ) दिवाण हे खरे जबाबदार मंत्री बनतील अशी संधीच त्यांस देण्यांत आली नाहीं. ( ३ ) कांही थोडे अपवाद वगळून बहुतेक प्रांतांतून मंत्रिमंडळांच्या संयुक्त बैठकी भरविण्याची टाळाटाळ करण्यांत आली. ( ४ ) सोपीव खात्यापुरतें तरी सर्व दिवाणांचे मिळून एक मंत्रि- मंडळ आहे असें न मानतां गव्हर्नरसाहेब प्रसंगानुरोधानें एकेकट्या दिवाणाचाच सल्ला घेत. (५) सोपीव व राखीव अशी अलग वर्गवारी करणे जवळ जवळ अशक्य असल्यामुळे राखीव खात्यांतील कारभारामुळे उत्पन्न झालेल्या असंतोषा- च्या ज्वाळा सोपीव खात्यांच्या कारभाराला तापदायक झाल्या आणि त्यामुळे तत्त्वानुरोधानें पक्षभेदाची मांडणी होऊं शकली नाही. ( ६ ) मेस्टनसाहेबांच्या प्रांतिक खंडणीच्या व्यवस्थेमुळे दिवाणांना लोकहितकारक अशी कामे हाती घेण्यास पैशाची टंचाई भासूं लागून दिवाणांच्या हातून जनतेच्या डोळ्यांत भरेल अशी कामगिरी होऊं शकली नाहीं. (७) फडणविसी खात्याचा सासुरवासहि दिवाणांना फार भोंवला. अशा रीतीनें तकारसप्तक लिहून माजी दिवाणांनी आपल्या अयशस्वी कारकीदीच्या दोषारोपांतून स्वतःचा बचाव करण्याकरितां ही एक प्रकारें कैफी- यतच दिली आहे. पण माजी दिवाणांची कारकीर्द यशस्वी कां झाली नाही याची चौकशी करण्याकरितां कांहीं हें कमिशन नेमले नव्हतें. सुधारणा सुचविण्याकरितां ते नेमलेलें होतें; व त्या दृष्टीने पाहतां अल्पमतवाल्या सभासदांनी विधायक सूचना केल्या नाहीत. द्विदल राज्यपद्धति निष्फळ ठरली आणि यापुढेहि तिच्या- पासून कोणीहि मुफळ प्राप्त होण्याची अपेक्षा बाळगूं नये एवढे मत मात्र या