पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध चळवळ पुनश्र अंगीकारण्यापूर्वी असहकारितावादी आणि आत्मसंरक्षण या प्रश्नाचा विचार करून या दोहोंचा मेळ कसा घालवावयाचा तें त्यांनी ठरवून टाकावें. या संबंधांत त्यांची विचारसरणी जनतेस पटेल व व्यवहार्य दिसेल तरच तिचा आतां यापुढे या तत्त्वावरचा विश्वास अढळ राहील. मुंबईत गेल्या पांच दिवसांत जे घोर प्रकार घडले त्यावरून याउपर या प्रश्नाकडे डोळेझांक करून चालावयाचें नाहीं हे उघड दिसत आहे. नोकरशाहीच्या भलेपणावर अवलंबून राहिल्याने केवढे अरिष्ट कोसळेल याची थोडीशी कल्पना सातारा जिल्ह्यांतील व मलबारांतील प्रकारावरून ध्यानी आलीच होती. तथापि ही नोकरशाही मुंब। पुरीसारख्या राज- धानीला तरी यमपुरी बनविणार नाही असे वाटत होते; पण तेंहि खोटे ठरल्यानें नोकरशाहीच्या नैतिक अधःपाताची कमाल मर्यादा कळून चुकली. शिरोभागी दिलेल्या श्लोकांत वर्णिल्याप्रमाणे ज्या वेळी दुष्ट, संपत्तीच्या मदानें धुंद, नीच आणि स्वार्थलंपट अशा वर्गाच्या हातांत अधिकारसूत्रे येतात त्या वेळी ' हा प्रजे क गमिष्यसि ' असा प्रश्न विचारण्याची पाळी येते. दुर्दैवाने मुंबई शहरांतच असा प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे. त्या प्रश्नाला स्वावलंबनाच्या आणि स्वाभि मानाच्या तत्त्वास पटेल असे उत्तर देण्याची असहकारितावाद्यांनी तयारी करावी एवढा बोध मुंबईतील या दंग्यापासून आपण घेतला पाहिजे. शंखान् दध्मः पृथक् पृथक् [ माँटेग्यु-चेल्म्सफर्ड रिफॉर्म्सचा अनुभव पांच वर्षे वेतल्यानंतर हिंदी लोकांना स्वराज्याचा त्या पुढचा हप्ता देण्यापूर्वी चालू द्विदल पद्धतींतील गुण- दोषांचा आढावा वेऊन नवीन सुधारणा सुचविण्यासासाठी सर ए. मुडिमन यांच्या अध्यक्षतेखालीं एक कमिटी नेमण्यांत आली होती. तीत डॉ. सप्रु, सर शिवस्वामी अय्यर, डॉ. परांजपे व बॅ. जिना असे प्रमुख हिंदी पुढारीहि सभासद होते. मुडिमन व त्यांचे गोरे व गोराळलेले सहकारी यांनी हिंदी पुढा-यांच्या सूचना न स्वीकारतां चहुमताच्या जोरावर आपला रिपोर्ट लिहिला. तेव्हां डॉ. सप्रु प्रभृतींनींहि आपला अल्पमतवाल्यांचा रिपोर्ट वेगळा लिहिला. असे दोन पृथक् पृथक् रिपोर्ट मिळून हा कमिटीचा रिपोर्ट पुढे आला आणि त्या दोहों- तहि स्वराज्याच्या दृष्टीनें पुढें पाऊल पडण्यासारखा भाग कांहींच नाहीं हैं पाहून त्या रिपोर्टाची संभावना या लेखांत वरील मथळ्यानें करण्यांत आली आहे. ] ( केसरी, दि. १० मार्च १९२५ )