पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईच्या दंग्यापासून बोध घ्या पहिल्या प्रश्नासंबंधाने कित्येकांचा थोडासा गैरसमज झाल्याप्रमाणे दिसतो. असहकारी इसमाने स्वतः कोणत्याहि प्रकारे अत्याचार करावयाचा नाही. हे खरें; पण त्यामुळे त्याचा पीनल-कोडानें दिलेला आत्मसंरक्षणाचा हक नष्ट होतो असे नाही. मुंबईस किंवा इतरत्र देवळांत शिरून किंवा स्त्रियांची बेइज्जत करून जे अत्याचार करण्यांत आले त्यांचा प्रतिकार करण्याला त्या जागेवर हजर असून व अंगी सामर्थ्य असून जर कोणी केवळ अनत्याचाराच्या भलत्याच कल्पनेनें आत्म- संरक्षणाचा हक्क बजावण्याला कसूर केली असेल तर त्यांच्या हातून तो एक महा- दोषच घडला असे मानले पाहिजे व निदान त्याची पुनरावृति तरी होणार अशी खबरदारी घेतली पाहिजे. नाहीं, ग़ २६०/३० आत्मसंरक्षणाची स्वावलंबी उपाययोजना दुसरा प्रश्न वैयक्तिक नसून सामुदायिक व जास्त व्यापक आहे. एखादें गांव, शहर, तालुका अगर जिल्हा अशा विस्तृत क्षेत्रांत झालेला असहकारितेचा प्रसार हाणून पाडण्याकरितां नोकरशाहीनें जर तेथील नागरिकांच्या संरक्षणाचे काम आपल्या अंगाबाहेर टाकले तर असहकारितावाद्यांनी स्वसंरक्षणाची तजवीज कशी करावयाची ? नोकरशाही असा प्रसंग आणल्याशिवाय कधी राहणार नाही, हे दोन- तीन ठिकाणच्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे. मलबारांत मोपले लोकांकडून हिंदु लोकांवर व त्यांच्या पवित्र देवालयांवर जे भ्रष्टाकाराचे अनन्वित प्रसंग येत आहेत ते बंद पाडण्याची सरकारच्या अंगी शक्ति नाही असें बिलकूल नाहीं. खरी इच्छा असेल तर पांच दिवसांत हे अत्याचार अजीबात बंद पडूं शकतील पण हिंदु-मुसलमानांत फूट पाडण्याची आणि हिंदी लोकांना आपल्या पराधीन- फ्णाची जाणीव करून देण्याची संधि नोकरशाही व्यर्थ कां दवडील ? मुंबई शहरांत देखील स्त्रियांची इज्जत घेण्यापर्यंत जी अत्याचाराची कमान वर चढली ती तर पोलिसांच्या डोळेझांकीनेंच होय, यांत तिळमात्र संदेह नाहीं. अशा परिस्थितीत दीर्घकालीन पारतंत्र्यामुळे अंगी खिळलेल्या शांततेच्या व संरक्षणाच्या पराधीन- पणाच्या कल्पना सोडून देऊन कांही तरी स्वावलंबी उपाययोजना केली पाहिजे. हा प्रश्न चटकन चुटकीसरशी सुटण्यासारखा सोपा नाही. किंबहुना आत्मसंरक्षणाची योजना व स्वराज्याची संपादणी हे दोनहि प्रश्न एकमेकांत इतके निगडित झाले आहेत की, एकाचा विचार करतांना दुसऱ्याचा विचार टाळतां येत नाहीं. तें कसहि असो; पण असहकारितेचें जें पाऊल पुढे टाकावयाचे त्यांत इतर बाबींचा विचार करण्याच्या आधी या प्रश्नांची भवति-न- भवति झाली पाहिजे. महात्मा गांधी हे ता. २३ पासून गुजराथेत बारडोली व आनंद या तालुक्यांत कायदेभंगाची चळवळ सुरू करणार होते. मुंबईस घडलेल्या अत्यंत शोचनीय प्रकारामुळे त्यांनी विचारत तहकूब केला आहे. भातां ही यापुढे