पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मोडून खन, दरवडे, जबरीसंभोग इत्यादि घोर अपराध करून तुरुंगांत सजा भोगीत असतात त्यांच्यावरहि त्या ठिकाणी कोणी अत्याचार करूं लागल्यास सरकारी संरक्षकांस त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जर टाळतां येत नाहीं तर केवळ कोणी शाळा सोडली अगर गांधी-टोपी घातली एवढ्याने ती जबाबदारी नाहीशी कशी होईल ? पण हा सगळा तात्त्विक व सात्त्विक विचार झाला. ज्याला जाणूनबुजून असहकारितावाद्यांची टवाळी करावयाची असेल त्याला हे ब्रह्मज्ञान सांगून काय उपयोग ! आणि मुंबईतील पोलिसांनी अशाच प्रकारें जाणूनबुजून असहकारितावाद्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे, जुलुमाकडे व अत्याचाराकडे डोळे- झांक केली असे दिसतें. पोलिसांच्या डोळ्यादेखत डॉ. साठे यांजवर बदमाशांच्या टोळीने हल्ला केला, पण पोलिसांनी तिकडे दृष्टिक्षेपहि केला नाही. आणि डॉ. साठे यांनी त्या बदमाषांची नांवें टिपून घेण्यास सांगितले असतां तिकडे लक्षच दिलें नाहीं. डॉ. आघारकर यांचीहि अशीच तक्रार आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईची कथा एवढ्यावरच संपली नाहीं. दंगेखोरांपासून निरपराधी इसमांचे रक्षण करणे तर दूरच राहिलें; उलट जे पाजी लोक असहकारीपक्षाच्या अनुयायांवर हल्ला करीत होते त्यांस पोलिसांनी अनेक मार्गानी मदत केल्याचाहि बोभाटा आहे व तो बराच साधार आहे. या बदमाषांना विशेषतः पारशी दंगेखोरांना, मोटारी, काठ्या, लाट्या आणि पिस्तुलेहि मिळत आणि त्यांच्या साहाय्याने ते पोलिसांच्या देखत देखत महात्माजींच्या अनुयायांवर हल्ले चढवीत. पारशी तरुणांना सात-आठशेपर्यंत पिस्तुलें देण्यांत आली आहेत अशी बाजारबातमी आहे; तींत तथ्य कितपत असेल तें असो. परंतु अत्याचारांत पारशांनी पिस्तुलांचा उपयोग केला ही गोष्ट निर्विवाद आहे आणि ते सर्व नेहमींचे परवानेवाले असतील असें म्हणवत नाहीं. नोकरशाहीचें धोरण व्यक्त झालें एतावता गांधी- पक्षानें युवराजांच्या स्वागतावर कडकडीत बहिष्कार घालून नोकरशाहीचा जो नक्षा उतरविला त्याचा अशा रीतीनें सूड उगविण्यांत माला. आतां हा दंगा शांत होत आला आहे. तथापि या दंग्यांत घडलेल्या प्रकारां- पासून आपण योग्य तो बोध घ्यावयास नको काय ? सातारा जिल्ह्यांत सत्य- शोधकांच्या अत्याचारांस वाव देऊन नोकरशाहीनें जी आपल्या आसुरी वृत्तीची चुणूक दाखविली तिचाच मलबारांत मोठ्या प्रमाणावर प्रयोग चालू आहे, आणि आतां तर मुंबापुरीत खुद्द गव्हर्नरसाहेबांच्या बंगल्याच्या नजरेच्या टापूंत आणि स्वतः युवराजांचा व व्हाइसरॉयांचा मुक्काम त्या शहरांत असतांना या गोष्टी घडल्या आहेत, यावरून नोकरशाहीचें धोरण काय आहे ते व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत असहकारितावाद्यांचें कर्तव्य आणि त्यांनी आत्मसंरक्षणाची लजवीज कशी करावयाची याचा विचार ठरविला पाहिजे.