पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध राजांनी मुंबापुरीच्या धक्क्यावर पाऊल ठेविलें. सरकारी सलामीच्या तोफांचा दश- दणाट, मूठभर निमंत्रित दरबारी मंडळींच्या टाळ्यांचा कडकडाट वगैरे आँप- चारिक विधि होऊन म्युनिसिपालिटीचें मानपत्र देण्यांत आले आणि त्या मानपत्रास ठराविक उत्तर देऊन युवराजांची स्वारी दरबारी थाटाने सरकारवाड्याकडे मिरवत चालली. परंतु स्वागताच्या मिरवणुकीवर जनतेनें इतका कडक बहिष्कार घातला होता की, रस्त्यांतला तो शुकशुकाट पाहून नोकरशाहीच्या हस्तकांच्या मनांत जळफळाट झाल्याशिवाय राहिला नाही. अशा प्रकारचें हें स्वागताचें नाटक एकी- कडे चालू असतां दुसरीकडे महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा भरून तीन लक्ष श्रोतृसमूह त्यांचे उपदेशपर शब्द अत्यंत औत्सुक्याने ऐकण्यांत आणि आपल्या गुलामगिरीचे निदर्शक असे जे परदेशी कपडे त्यांची होळी करण्यांत दंग झाला होता. हांजीखोर लोकांचा पाजीपणा नोकरशाहीनें आपली सगळी पुण्याई खर्च करून हा स्वागतसमारंभ अपूर्व थाटाचा करण्याचे योजिले होते; पण त्याचा अशा रीतीने नक्षा उतरलेला पाहून नोकरशाहीच्या पुढयांतल्या आणि नोकरशाहीची हांजी हांजी करण्यांत निविले- ल्या अशा हांजीखोर लोकांची अत्यंत निराशा झाली; आणि त्या निराशेनें चिह्न जाऊन त्या हांजीखोर लोकांनी पाजीपणा करण्यास प्रारंभ केला. या कामांत प्रथ- मतः युरेशिअन्स, ज्यू, नेटिव्ह ख्रिश्चन वगैरे लोक होते, आणि लवकरच त्यांत कांही पारशांची भर पडून ही चौकडी पूर्ण झाली. युवराजांच्या स्वागतावर बहिष्कार घालण्यांत महात्मा गांधींचे अनुयायीच प्रमुख असून त्यांना ओळखून काढण्याचें चिन्ह म्हणजे गांधी-टोपी व खादीचा कोट होय. अर्थातच नोकरशाहीच्या हस्त- कांना गांधी-टोपी व खादीचा कोट यांचे दर्शन असह्य झाले आणि त्यांनी त्या.. विरुद्ध आपली मोहीम सुरू केली. गेले पांच दिवस मुंबईत जो दंगा माजून राहिला होता व ज्या दंग्याने 'मुंबापुरीला यमपुरी' बनविलें त्या दंग्याचे बीज यांत आहे. दंग्यास एकदां प्रारंभ झाल्यावर 'क्रियेसारखी प्रतिक्रिया' या निसर्गसिद्ध निय मानें दुसऱ्या पक्षाकडूनहि कांही आगळीक झाली नाही असे नाही. परंतु असह- कारितापक्षाचे जे खरे अनुयायी आहेत त्यांनी इतक्या भयंकर अत्याचारांत देखील आपला अनत्याचारीपणा कायम राखण्याची शिकस्त केली; पण त्याचा परिणाम मात्र विपरीत झाला. प्रतिकाराची उपाययोजना हवी या दंग्यांत कोणती कोणती पाजीपणाची कृत्यें झडलीं यांची त्रोटक हकीगत दुसरीकडे दिलीच आहे. तिची पुनरावृत्ति करून लेखणी विटाळणेहि अनुचित होय. परंतु या अत्याचारी प्रकारांपासून आपण बोध काय घ्यावा याचा विचार