पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. मुंबईच्या दंग्यापासून बोध भ्या येण्याकरितां विलायतेंतून निघण्यापूर्वीच आपल्या आगमनावर बहुजनसमाजाकडून बहिष्कार घालण्यांत येणार आहे ही वार्ता युवराजांच्या कानावर गेली होती का नाहीं, न कळे. परंतु युरोप व आफ्रिका या खंडाची सरहद्द ओलांडून मुंबई इला- ख्याच्या पहिल्या नाक्यावर येऊन पोंचतांच आपल्या स्वागताच्या संबंधांत केवढे रण माजून राहिले आहे, याची निदान अंधूक तरी कल्पना राजपुत्रास आली असेलच. कारण इंडियन मर्चेंट्स् चेंबर व ब्यूरो या संस्थेत मानपत्रासंबंधानें दोन तट पहून मानपत्र देण्याचा ठराव बहुमताने नापसंत ठरविला ही बातमी लक्ष्मी- दास तेरसी यांनी तारेनें एडनलाच युवराजांना कळेल अशी तजवीज केली होती. त्यांतूनहि त्यांस तेथें ती नच कळाली तरी मुंबई बंदरावर पाऊल ठेवण्यापूर्वी तरी ती त्यांच्या कानावर जावी या हेतूनें लक्ष्मीदास तेरसी यांनी बिनतारी विद्युत्- संदेशाचाहि उपयोग केला होता. एवंच मुंबापुरीतील इस्लामी समाज, मुंबईतील बडे हिंदी व्यापारी, मुंबईच्या विश्वविद्यालयाचे विद्यार्थी आणि मुंबई शहरांतील सामान्य जनता या सर्व वर्गात युवराजांच्या स्वागतावर बहिष्कार घालण्याची तीव्र अहमह- मिका चालू असतां मुंबई सरकारने या वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष करून युवराजांना एडन बंदरांत पाऊल ठेवतांना संदेश धाडला की, मुंबई इलाख्यांतील प्रजाजन आपले फार मोठ्या प्रेमानें व उत्साहानें स्वागत करीत आहेत. १५१ नोकरशाहीला धाकधूक वाटं लागली वस्तुस्थितीचा सर्वस्वी विपर्यास करणारा असा हा संदेश युवराजांकडे धाड- तांना मुंबई सरकारास अशी घमेंड वाटत असली पाहिजे की, स्वागतावर बहि- प्कार घालण्याची जी चळवळ चालली आहे ती आपण सहज चिरडून टाकूं, निदान त्या निषेधाचा आवाज युवराजांच्या कानावर तरी खास जाऊं देणार नाहीं. यज्ञांत बळी दिल्या जाणाऱ्या बोकडाचा अपशकुनी आवाज यजमानाच्या कानी पहुं नये म्हणून तो बळी ठार करतांना ज्याप्रमाणे मुद्दाम वेदघोष व वाद्यघोष करण्यांत येतो, त्याप्रमाणें नोकरशाहीच्या हस्तकांच्या कृत्रिम स्वागताच्या दणदणाटांत लोकशाहीचा विरोधक आवाज लुप्त होऊन जाईल अशा भ्रमांत सरकारने स्वागता- च्या नाटकाची तयारी चालविली होती. पण नाटकाचा पडदा वर उचलून नांदी म्हणण्याची वेळ जसजसी जवळ येत चालली तसतसी नोकरशाहीचीहि भ्रांति दूर होऊन तिला मनांतून धाकधूक वाटू लागली की, आतां आपला दंभ- परिस्फोट होऊन सगळ्या रंगाचा बेरंग होणार. ही भीति खरी होण्याची स्पष्ट चिन्हें दिसूं लागतांच नोकरशाहीचा नूर बदलला व तिनें निराळाच डाव टाकण्यास सुरुवात केली. कार्यक्रमांत ठरल्या वेळी युबराजांची स्वारी बंदरांत येऊन दाखल झाली. बडे व छोटे लाट स्वारीच्या स्वागतार्थ सामोरे गेले आणि थोड्याच वेळांत युव-