पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मुंबईच्या दंग्यापासून बोध घ्या [ इ. स. १९२१ च्या नोव्हेंबरच्या १७ तारखेस त्यावेळचे युवराज विलायतेहून मुंबईस येऊन बंदरावर उतरले. त्यांच्या स्वागतावर बहिष्कार घाल- ण्याचा आदेश काँग्रेसनें दिला होता. त्या आदेशास अनुसरून मुंबईत सर्वत्र हरताळ पाळण्यांत आला. त्या हरताळाच्या देखाव्यानें चिडून जाऊन कांहीं सरकारच्या बगलबच्यांनी गांधी-टोपीवाल्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. बहिष्कार टाकण्यांत हिंदु व मुसलमान या उभय समाजांचें एक मत असल्यानें मुंबईतला हा दंगा नेहमीप्रमाणें हिंदु व मुसलमान यांच्यामधला नसून एका बाजूस सरकारचे मिंधे युरेशिअन्स, ज्यू, पारशी इत्यादि लोक व दुसरीकडे काँग्रेसनिष्ट हिंदु व मुसलमान असा हा दंगा होता. काँग्रेसचे अनुयायी असहकारितावादी असल्यानें पोलिसांनी काँग्रेसवाल्यांना या दंग्यांत संरक्षण दिले नाहीं, एवच नव्हे तर उलट पक्षपात करून दंगेखोरांनाच मदत केली. काँग्रेसवाल्यांनी अनत्या- चाराच्या भ्रामक कल्पनेनें आत्मसंरक्षणार्थहि प्रतिकार केला नाही. यामुळे अने- कांना निष्कारण पीडा झाली, स्त्रियांची बेइज्जत करण्यांत आली आणि मालाचीहि नासधूस झाली. तरी अशा परिस्थितीत अनत्याचाराची व प्रतीकाराची योग्य मर्यादा कोणती ते ठरवून अनत्याचारवाद्यांनी त्याप्रमाणे वागावें आणि असह- कारितावाद्यांना पोलीस संरक्षण देऊ इच्छीत नाहीं तेव्हां असहकारितावाद्यांना आत्मसंरक्षणाची स्वावलंची योजना केली पाहिजे, असा बोध मुंबईच्या या दंग्या- पासून घेण्याविषयीं या लेखांत सुचविलें आहे.] खलेन धनमत्तेन नीचेन प्रभविष्णुना । पिशुनेन पदस्थेन हा प्रजे व गमिष्यसि ॥ लक्ष्मीदास तेरसी यांनी संदेश घाडला होता हिंदुस्थानांतील शेकडा ९० लोक नको नको म्हणत असतांना त्यांच्या निषेधाकडे दुर्लक्ष करून नोकरशाहीने आपल्या हट्टानें युवराजांस इकडे आणविले आणि आतां त्याचा दुष्परिणाम प्रगट होण्यास प्रारंभ झाला आहे. हिंदुस्थानाकडे ( केसरी, दि. २२ नोव्हेंबर १९२१ ) A