पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संजय - शिष्टाई १४९ तिची व्याप्ति सर्व देशभर आणि सर्व वर्गात आहे आणि त्या असह- कारितेकरितां हजारों लोक आपल्या स्वार्थावर लाथ मारीत असल्यामुळे ते कांहीं तरी थोतांड नसून हिंदी जनतेच्या अंतःकरणास खराच पीळ पडला आहे असहि ड्यूकसाहेबांस कबूल करावें लागेल. मनुष्य स्वभावतःच उत्सवप्रिय असतो, असें असूनहि ज्या अर्थी ड्यूकसाहेबांच्या स्वागत समारंभांत जनतेनें काडीमात्र भाग घेतला नाही व तीन-तीन दिवसांची हजारों रुपयांची प्राप्ति बुडवून हरताळ पाळला त्या अर्थी तो केवळ आपले नाक खाजवून दुसन्यास खिजविण्याकरितां नसला पाहिजे हें हिंदी जनतेची तीस वर्षांपूर्वीची प्रवृत्ति पाहिलेल्या काकासाहेबांना कळल्याखेरीज कसें राहील ? त्याचप्रमाणं ही असहकारितेची मोहीम किती शांतपणे आणि अत्याचारविरहित चालविली जात आहे व या अहिंसा तत्त्वांतच कसं अद्भुत सामर्थ्य सांठविलेले असते, हंहि ड्यूकसाहेबांसारख्या अनुभविक मुत्स- इयांस सांगावयास नको. हा अनुभव कांहीं नवा नसून जगाच्या प्रारंभापासूनचाच आहे. संजयाने पांडवाकडची हकीकत सांगितल्यावर वृतराष्ट्राच्या तोंडूनहि असेच उद्गार निघाले की, मी 'शमप्रधान' धर्माला जितका भिती तितका आततायी भीमालाहि भीत नाहीं. अर्थातच हिंदी जनतेची असहकारितेची चळवळ अत्याचार- रहित असल्याने तिचा मोठासा गाजावाजा होत नसला तरी जगाला थक्क करून सोडण्यासारखे आत्मबल त्या चळवळीत आहे. आणि हें आत्मिक सामर्थ्य पाशवी- बलाने हाणून पाडणे कठीण आहे. याच्यापुढे आपल्या तोफा रद्द आहेत, विमानांची गति कुंठित होणार आहे, बाँबचा स्फोट निष्फळ होणार आहे; बंदुकांचा नेमहि त्यावर चालणार नाही. हें रणगाजी डचूकसाहेबांच्या लक्षांत आलें नसेल काय ? सारांश, हिंदी राष्ट्राचे गान्हाणे काय आहे त्यांची चळवळ कोणत्या भक्कम पायावर उभार- लेली आहे, तिची व्याप्ति किती विस्तृत आहे, तिच्याकरितां स्वार्थावर पाणी सोडण्यांत किती तत्परता दिसून येत आहे आणि या सर्वांवर स्वराज्याचें संपूर्ण हक देणें एवढेच एक औषध कसे रामबाण लागू पडेल याचा यथार्थ पाढा ड्यूक- साहेबांनी ब्रिटिश अधिकारी मंडळापुढे वाचला तरच त्यांनी हें शिष्टाईचें कार्य मनःपूर्वक कळकळीनें केलें असे सिद्ध होईल; आणि हिंदी जनतेकरितां त्यांनी आपला हा खरा अभिप्राय मंत्रिमंडळापुढे मांडणे हेच त्यांच्या उमद्या शीलास शोभ- णारं असल्यामुळे डयुकसाहेब कर्तव्यविन्मुख होणार नाहीत असे आम्हांस वांटते.