पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध सहकारिता करील, नाहीं तर तिची असहकारितेची तपश्चर्या अशीच चालू राहील,. ही गोष्ट ब्रिटिश प्रधानमंडळाच्या कानावर यथातथ्य जाण्याला ड्यूकसाहेबांची 'चक्षुवसत्यं' अशी साक्ष उपयोगी पडेल. आजपर्यंत आपण आपली ही मागणी राष्ट्रीय सभेच्या व इतर मार्गांनी जाहीर करीतच आहो; परंतु विलायती पत्रांतून आणि नोकरशाहीच्या रिपोर्टातून तिचें यथार्थ स्वरूप तिकडे न दर्शवितां विकृत स्वरूपच दर्शविले जात आहे. पण आतां प्रत्यक्ष बादशाहांचे काकाच येथे येऊन सर्व गोष्टी समक्ष पाहून गेले आहेत. तेव्हां आतां इकडील जनतेचें खरें हृद्गत कळवून मदांध मंत्रिमंडळाच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणें हें त्यांचें कर्तव्यच आहे. येथील नोकरशाहीनें ड्यूकसाहेबांना फारसे कोणास भेटू दिले नाहीं, स्वतंत्रपणे कोणाची मुलाखत घेऊं दिली नाहीं, फार तर काय पण दिल्ली राजधानीच्या चांदणी चौकांतून, किंवा मुंबापुरीच्या मोतीबाजारां- तूनांहे त्यांस फेरफटका करूं दिला नाही. यामुळे अवश्य प्रेक्षणीय अशा अनेक गोष्टी त्यांच्या पाहण्यांतच आल्या नसल्याने ते बहुजनमनोगताविषयी काय सांगू शकतील अशी कित्येकास शंका येईल, परंतु ब्रह्माचा उपदेश करीत असतां 'गुरौस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु च्छिन्नसंशयाः' हा न्याय जसा लागू पडतो तसाच प्रकार येथें असून जनतेच्या केंद्रस्थानाचं अदर्शन हेच प्रत्यक्ष दर्शनापेक्षां शतपटीने ड्यूकसाहेबांच्या मनावर अधिक परिणामकारक झाले असले पाहिजे. अहिंसा तत्त्वांतलें अद्भुत सामर्थ्य व अशा प्रकारें हिंदुस्थानांतील या दौऱ्याचा आपल्या मनावर जो परिणाम झाला असेल त्याचें यथातथ्य चित्र रेखाटणें हें ड्यूकसाहेबांचे कर्तव्यच आहे व तें ते निर्भीडपणें व निःपक्षपातपणे पार पाडतील तर हिंदी जनतेचा बराच कार्यभाग होईल. धृतराष्ट्रानें ज्याप्रमाणे संजयाला खोदखोदून प्रश्न विचारून समग्र माहिती मिळविली त्याप्रमाणें ब्रिटिश मंत्रिमंडळ जर ड्यूकसाहेबांचे अंतःकरण खुले करून त्याचा ठाव घेईल तर त्यास काय दिसेल बरें ? पंजाबच्या बाबतीत जी भयंकर प्रमाद घडला त्याचें परिमार्जन किती केले तरी तें थोडेंच आहे असेंच त्यांस आढ- ळून येईल. लेडी मंकबेथला आपल्या हातावर असलेला रक्ताचा डाग किती धुतला तरी जात नाहीं असा भ्रम झाला होता. नोकरशाहीच्या हातावरील रक्ताचा डाग तसा भ्रममूलक नसून तो खराखुराच आहे आणि त्याचा दुसरा विशेष हा की, तो डाग केवळ वरवरचा नसून ब्रिटिश राज्यपद्धतीमुळे तो नोकरशाहीच्या अंगी खिळलेला आहे. हा डाग दूर व्हावा आणि पुनः त्याचा उद्भव अन्य ठिकाणी वा अन्य स्वरूपानें होऊं नये याकरितां हिंदी जनतेला स्वराज्याचा दिखाऊ नव्हे तर भरीव हक दिल्याशिवाय गत्यंतर नाहीं असंच ड्यूकसाहेबांचें मत पडेल. त्याच- प्रमाणे असहकारितेची चळवळ ही विशिष्ट वर्गाची व वरकरणी नसून