पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संजय-शिष्टाई १४७ या मनःस्थितीचा पगडा अधिकाधिकच बसला असावा. काकासाहेब हिंदुस्था- नांत येतांना किती उमेदीनें व उत्साहाने आले असतील आणि परत जातांना त्यांचा केवढा मनोभंग झाला असेल याचें चित्र मनश्चक्षूसमोर उभे राहिले म्हणजे कीव येते. डयूकसाहेबांसारखा राजघराण्यांतला बडा प्रतिष्ठित पाहुणा, घरी चालून आला असतां त्यांना अशा विमनस्क स्थितीत परत जावें लागावें ही गोष्ट अतिथिदेवो भव' हा उपदेश अहर्निश अक्षरशः पाळणाऱ्या आर्याच्या मनास असह्य वाटते. पण त्यांस हिंदी लोकांचा निरुपाय आहे. ड्यूकसाहेब येतांनाच जर रिकामे हात हलवीत आले. तर जातांनाहि त्यांना रिक्तहस्तेंच जावे लागल्यास तो दोष कोणाचा ? पाहुणा घरी आला म्हणजे त्याने इतर कांहीं न दिलें तरी पोरांच्या हातांवर पांच बोरें तरी ठेवावी असा शिष्टसंप्रदाय आहे ? पण येथे पाहावें तो डचकसाहेबांच्या फराळाच्या डब्यांत सगळाच खडखडाट; मग परत जातांना तो डबा लाइकरंज्यांनी भरला जावा अशी अपेक्षा त्यांनी तरी कां करावी ? त्यांतूनहि हिंदी लोक कांहीं पाश्चात्यासारखे कवडीचुंबक व कांटेकोर हिशेब करणारे नाहीत; तेव्हां त्यांनी ड्यूकसाहेबांची पाठवणी त्यांच्या योग्यतेस साजेल अशी निरपेक्षपणे केली असती. परंतु सुतकी घरांत दुखवट्याचा निरोप घेऊन आलेला गृहस्थ जर यजमानाचें सुतक फिटेपर्यंत वाट न पाहतां परत चालला तर त्यास यजमानाचा इलाज काय ?. ड्यूकसाहेबांनी तथ्य हेरलें असेल एवंच आपली ही संजयशिष्टाई निष्फळ झाली हें ड्यूकसाहेबांच्या लक्षांत आले आहे. आणि अतःपर आपण असल्या शिष्टाईच्या भानगडीत पडणार नाहीं असेंद्दि त्यांनी जाहीर केले आहे. यांच्या वयोमानावरून व प्रस्तुतच्या त्यांच्या अनुभवावरून त्यांचा हा निश्चय स्वाभाविकच आहे. तथापि तूर्त त्यांनी जी शिष्टाई पत्करली होती तिची यथासांग पूर्तता करून नंतरच ते आपला बेत अमलांत आणतील असे मानण्यास हरकत नाहीं. हिंदुस्थानांत ज्या कार्योद्देशाने ते आले होते तो हेतु जरी त्यांच्या किंवा नोकरशाहीच्या दृष्टीने सफळ झाला नसला तरी हिंदी जनतेच्या दृष्टीनें तो सफळ झाला आहे. स्वराज्याचा जो लहानसा तुकडा हिंदी लोकांस देण्यांत आला आहे तेवढ्यानें आमचें समाधान झालेले नाहीं; पंजाबांत लष्करी सोटेशाहीनें जो धिंगाणा घातला त्याबद्दल त्या दंगेखोरांस पूर्ण प्रायश्चित्त मिळून असला प्रकार पुनः न घडेल असा योग्य बंदोबस्त झाला पाहिजे; तुर्की तहाची फेरचौकशी होऊन मुसलमानांची किमान मागणी त्यांच्या पदरांत पडली पाहिजे आणि हिंदी राष्ट्राच्या हृदयास डाचणारी गुलामगिरीची स्थिति जाऊन त्यास स्वयंशासित राष्ट्राप्रमाणे स्वराज्याचे संपूर्ण अधिकार मिळाले पाहिजेत; तरच हिंदी हिंदी लव लोकरशाहीशी एकदिलानें 4