पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संजय-शिष्टाई १४५ तसा कृष्णशिष्टाईच्या तेजापुढे इतरांच्या शिष्टाईचा स्मृतिलोप झालेला असतो. त्यांतूनहि डोकें खाजवून आठवण केलीच तर अंगदशिष्टाई डोळ्यापुढे उभी राहते. आज आपणांस कृष्णशिष्टाईचा किंवा अंगदशिष्टाईचा विचार कर्तव्य नसून संजयशिष्टा- ईचीच चर्चा करावयाची आहे. चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आलेच असेल की, कनॉटचे ड्युकसाहेब जे हिंदुस्थानांत आले होते ते हिंदी जनतेस कांहीं विशिष्ट संदेश सांगण्याकरितां, अर्थातच एक प्रकारची शिष्टाई करण्याकरितां आलें होतें. आमचे हक किंवा अधिकार आम्हांस परत द्या अशी मागणी करण्याकरितां श्रीकृष्णाने आणि अंगदानेंहि शिष्टाई केली. डय़कसाहेब कांहीं असली शिष्टाई करण्याकरितां आले नव्हते, कारण हिंदी जनतेने दुसऱ्या कोणाचें कांहीं लुबाडलेले नाही तर तिच्याकडे मागणी करावयास तरी कोण कसा येणार ? तथापि ड्यूकसाहेबांना हिंदी जनतेजवळ एक मागणी करावयाची होती व ती त्यांनी दिल्ली शहरी केली. ती मागणी ' झालें गेलें तें विसरा आणि क्षमा करा' ( Forget and Forgive ) ही होय. महाभारतांतील जी संजयशिष्टाई तीहि असल्याच स्वरूपाची होती. ड्यूक साहेबांच्या या शिष्टाईत व संजयशिष्टाईत पदोपदी विलक्षण साम्य आढळून येते. परंतु प्रत्येक पदागणिक त्याचें दिग्दर्शन करण्याचे कारण नाहीं; महाभारताच्या वाचकांस त्याचें मर्म लक्षांत येईलच. पंजाबांत आपल्या लष्करी व मुलकी अधिकान्यांकडून जे अत्याचार घडले आणि खिलाफतीच्या प्रकरणांत हिंदी मुसलमानांची जी मने दुखावली गेलीं त्याच्या प्रतिकारार्थ कांहीं तरी उपाययोजना केल्यावांचन हिंदी जनतेची प्रक्षुब्ध मनोवृत्ति शांत होणार नाही हे ब्रिटिश मंत्रिमंडळास कळून चुकलं. पण अधिकारी वर्गास शासन करण्याचा हिय्या करवत नाहीं. आणि आपल्या चिकट मुठींतून अधिकारदानाचें उदकहि सोडवत नाहीं. अशा अडचणींत केवळ शाब्दिक आश्वा सनानें हिंदी जनतेचें सांत्वन करण्याचा डाव टाकून पाहण्याचें मंत्रिमंडळाने ठरविले आणि त्या कामगिरीवर हिंदी जनतेच्या पूर्वपरिचयाचें, लष्करी बाण्याचे, उमद्या मनाचे जे ड्यूकसाहेब त्यांची योजना करण्यांत आली. ब्रिटिश मंत्रिमंडळाचे हे घाट खरोखरीच अपूर्व होय. महात्मा गांधी हे अलीकडे नोकरशाहीला रावण- शाहीची उपमा देत असतात. पण तिला रावणशाहीपेक्षां धृतराष्ट्र शाहीचीच उपमा अधिक समर्पक ठरेल. कारण रावणानें सीतादेवीला परत न पाठविण्याचा हट्ट चाल- विला तरी निदान उलट रामाकडे 'झाले गेले ते विसरा' असला घट्टपणाचा निरोप तरी पाठविला नव्हता. ब्युरॉक्रसीला मात्र हिंदी जनतेच्या सात्त्विक वृत्ती- मुळे आणि स्वतःच्या कर्तबगारीच्या घमेंडीमुळे तितका विवेक राहिला नाही. आणि तिनें पंजाब व खिलाफत प्रकरण विसरून जा असे सांगण्याच्या अवघड कामगिरीवर ड्यूकसाहेबांची नेमणूक करून त्यांना विनाकारण संकटांत पाडले. क. ले. १०