पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध बुवास आतां स्त्रियाहि भीत नाहीत हे सुचिन्ह आहे. याकूब हुसेन व गोपाळ मेनन यांच्या पत्नी धैर्याने मद्रासेंत स्त्री वर्गात असहकारितेच्या तत्त्वाचा प्रसार करणार आहेत. त्याचप्रमाणे पुरुष वर्गानेंहि या उदाहरणावरून योग्य धडा घेऊन आपली चळवळ जास्त नेटानें चालविली पाहिजे. नव्या मनूंत जुने जुलमी प्रकार होणार नाहीत अशा अर्धवट समजुतीनें जे कौन्सिलर्स सहकारितेला अनुकूल झाले आहेत त्यांनी हा ताजा अनुभव पाहून तरी सावध व्हावे. अस्सल मवाळाविषयीं तर बोलावयासच नको. कारण त्यांचा नोकरशाहीवर इतका अढळ विश्वास आहे की, तिनें प्रत्यक्ष मान कापली तरी ती आपल्या हिताकरितांच कापली जात आहे असे ते म्हणतील व उलट त्यांच्या कौशल्याची तारीफच करीत बसतील. पण जे सहकारितावादी इतके श्रद्धान्ध झाले नसतील यांनी तरी या मदान्ध ब्युरॉक्रसीचे हे चाळे पाहावे आणि असले प्रकार स्वराज्याचे पूर्ण हक्क प्राप्त झाल्याशिवाय बंद पड णार नाहीत हे पक्के जाणून स्वराज्यप्राप्तीच्या असहकारितेच्या रामबाण उपायाचें आतां तरी अवलंबन करावे. ड्यूकसाहेबांच्या हातून प्रायश्चित्तविधि होत असतांनाच जी नोकरशाही नवें पाप करण्यास प्रवृत्त होते तिच्या शब्दावर अतःपर विश्वास ठेवणें म्हणजे स्वतः देशद्रोहाचें पाप करण्यासारखंच आहे. संजय-शिष्टाई [ हिंदुस्थानांत जालियनवाला बाग प्रकरण झाल्यानंतर असहकारितेचा उदय झाला आणि हिंदी जनतेंतील असंतोष असहकाराच्या रूपानें प्रकट होऊं लागला. त्या वेळीं बादशहांनी आपले काका ड्यूक ऑफ कनॉट यांना हिंदी लोकांची समजूत घालण्याकरितां पाठविलें. पांडवांचा अज्ञातवास संपवून ते आपलें राज्य परत मागूं लागले असतां धृतराष्ट्रानें पांडवाकडे शिष्टाई करण्या- करितां संजयाला पाठविलें. त्या वेळची संजयाची शिष्टाई व या वेळची ड्यूक- साहेबांची शिष्टाई यांत किती साम्य आहे हें दर्शवून असल्या शिष्टाईनें राष्ट्राची दिशाभूल होऊं नये असा इशारा देण्याकरितां हा लेख लिहिला आहे. ] ७ या शिष्टाईचें स्वरूप शिष्टाई शब्द कानी पडतांच स्वाभाविकपणें श्रीकृष्णशिष्टाईची आठवण होते; कारण चंद्राच्या स्वच्छ चांदण्यांत जसा लहानसहान चांदण्यांचा लोप होतो ( केसरी, दि. १ मार्च १९२१ )