पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायश्चित्ताच्या वेळींच नवें पाप १४३ थॉमस् यांचा कान पिरगाळण्यांत येईल आणि आमचे हे देशभक्त मद्रबंधु बंध- मुक्तहि होतील. पण तेवढ्यावरून ही दडपशाहीची झडप वैयक्तिक आहे, वरिष्ट अधिकाऱ्यांच्या धोरणाविरुद्ध आहे असे मानण्याचे कारण नाहीं. मद्रासचे हल्ह्रींचे गव्हर्नर लॉर्ड वुइलिंग्डन् हे मुंबई इलाख्यांतील जनतेच्या पूर्ण परिचयाचे असून लो. टिळक व बेझंटबाई यांच्या भाषणबंदीचे हुकूम त्यांच्याच हुकमतीने निघाले होते. यावरून आणि हल्लींच्या नव्या मन्वंतरांतहि मद्रास कौन्सिलांत त्यांचे जे धोरण दिसून आले आहे त्यावरून त्यांना या अन्यायाची चीड येईल व याबद्दल ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटास जाब विचारतील असे वाटत नाहीं आणि हे दडपशाहीचें वारें नुसत्या मद्रास इलाख्यांतील कालिकतच्याच मॅजिस्ट्रेटच्या कानांत भरलें नसून पंजाबांत, सरहद्दीवर, बहारच्या बाजूस व मध्यप्रांताच्या मध्यभागींद्दि तें वारें वाहत असून त्याची झुळूक हळुहळू एकेकास बाधूं लागली आहे. नोकरशाहीच्या अधिपतीकडे पहावे आणि त्यांची उक्ति सोडून कृतीचें निरक्षिण करावें म्हणजे तिच्यांत नवीन मन्वंतराचे प्रतिबिंब क्वचितच आढळून येईल. फार कशाला, ना. शास्त्री यांच्या ठराबावर बोलतांना सर वुइल्यम् व्हिन्सेंद्र यांनी साफ सांगितलें कीं, दडपशाहीचे कायदे दुरुस्त करण्याचा विचार करण्याकरितां कमिटी नेमली तरी कमिटीचें काम चालं असेपर्यंत सदर कायद्यांची बजावणी तहकूब ठेवण्याला आम्ही तयार नाहीं ! त्याचप्रमाणे जमनादास यांच्या ठरावावर भाषण करतांना सर मायकेल ओडवायर यांच्या दडपशाहीचा धिक्कार न करतां उलट तिचा पुर स्कारच करण्यांत आला ! यावरूनहि हेंच अनुमान निघते आणि तेच बरोबर आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं म्हणतात त्याप्रमाणे नोकरशाहीची ही सोटेशाही तिच्या हातांतील सोटा काढून घेईपर्यंत जाणार नाही. दडपशाहीच्या कामी ही नोकरशाही इतकी निर्ढावलेली आहे कीं, गोल्डस्मिथनें इटालियन लोकासंबंधी उद्गार काढल्याप्रमाणे पहिल्या पापाचें प्रायश्चित्तोदक पितां पितां पुढल्या पापाचा विचार तिच्या मनांत घोळत असतो. डयूक- साहेबांच्या समजुतीकरितां बडे लाट आणि जनतेच्या सांत्वनाकरितां स्वतः डयूकसाहेब नव्या मन्वंतराचे कितीहि गोडवे गावोत आणि गतगोष्टी विस- रून जाण्याविषयी कितीहि काकुळतीने गळ घालोत, जोपर्यंत नोकरशाहीचा दृष्टि- कोन बदलल्याचा स्पष्ट पुरावा दृष्टिपथावर येत नाहीं आणि उलटपक्षी जुन्या दडपशाहीवर नव्या जुलमाची पुढे चढत आहेत तोपर्यंत कलियुग जाऊन सलयुग आले असे मानण्याइतकें राष्ट्रीय पुढारी दुधखुळे नाहींत. असहकारितेचा रामबाण उपाय असो. नोकरशाही आपल्या वळणावर जावयाची ती गेलीच, पण जनतेनें मात्र या वेळीं आपले कर्तव्य करण्यास कचरतां कामा नये. तुरुंगवासाच्या बागुल- A