पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध याकूब हुसेन प्रभृति मद्रासी पुढान्यांनी या प्रसंगी दाखविलेले धैर्य अत्यंत अभिनंदनीय आहे व त्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यांत येत आहे. विशेषतः ते अलिगड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या विद्यार्थी बंधूंकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रकार्य करीत असतां आपल्याकडून अणु- मात्रहि अन्यायाची आगळिक झाली नसून नोकरशाही जर न्यायबुद्धि गुंडाळून ठेवून भलभलतें भकूं लागेल तर तिच्या कृतीचा सत्याग्रहाने प्रतिकार करणे हाच खरा मार्ग होय व त्या मार्गातील संकटास न जुमानतां जो बेगुमानपणें तोंड देतो तोच खरा राष्ट्रवीर होय. याकूत्र हुसेन यांस शिक्षा सांगतांना मॅजिस्ट्रेटने त्यास असा इशारा दिला की, कारागृहांतील सासुरवास तुम्हांस सोसवणार नाही याचा विचार करा. त्यावर याकूब हुसेन यांनी ताडकन् उत्तर दिले की, असल्या धमकीनें नमण्याइतका मी कच्च्या दिलाचा अदमी नाहीं; तुम्हांला काय शिक्षा करावयाची असेल ती खुशाल करा ! अशा रीतीने ही मद्रासी पुढाऱ्यांची चौकडी कानानोरच्या कारागृहाला पुंनीत करण्याकरितां मोठ्या आनंदाने तिकडे गेली. याकूब हुसेन व त्यांचे जोडीदार यांचें हें मनोधैर्य आणि नोकरशाहीचा आततायीपणा यांचा जनतेच्या मनावर योग्य तोच परिणाम होत आहे. ठिक- ठिकाणीं अभिनंदनपर सभा भरून त्यांच्याकडे संदेश रवाना होत आहेत. मलबार जिल्ह्यांत जागजागीं हरताळ घालण्यांत येऊन नोकरशाहीचा निषेध करण्यांत येत आहे; वकील आपली वकिली तहकूब करीत आहेत; विद्यार्थी शाळांवर बहिष्कार घालीत आहेत. मद्रासेहून राजगोपाळाचार्य प्रभृति पुढारी कालिकत येथील परि- स्थिति पाहण्याकरितां तेथें समक्ष गेले आहेत. याकूब हुसेन यांस अटक झाल्याचें वृत्त वाचतांच मद्रास कौन्सिलांतील एका सभासदानें कौन्सिलचें काम तहकूब ठेव- ण्याची सूचना पुढे आणली आणि तिला दहांहून अधिक सभासदांनी अनुमति दर्श- विल्यामुळे अध्यक्षास त्या सूचनेवर चर्चा करण्याची परवानगी द्यावी लागली, आणि त्या कौन्सिलांत नोकरशाहीच्या या अत्याचारावर खरमरीत टीका करण्यांत आली. दडपशाहीच्या कायद्याची बजावणी तहकूब नाहीं याकूब हुसेन वगैरेंना तुरुंगवासांत सहा महिने काढावे न लागतां तत्पूर्वी लवकरच वरिष्ठ सरकारच्या हुकुमानें त्यांची मुक्तता होईल आणि मद्रास इला- ख्याच्या एका कोपऱ्यांतील एखाद्या मॅजिस्ट्रेटनें चुकून कांही आगळीक केली तर तेवढ्यावरून सगळीच नोकरशाही पूर्वीच्या वळणावर गेली असे म्हणतां येणार नाहीं अशी जी कित्येकांची विचारसरणी आहे तींत बिलकूल अर्थ नाहीं. या अन्यायाचा फारच बभ्रा झाला, सगळीकडूनच निषेध होऊं लागला आणि विशेषतः ड्यूकसाहेबांची स्वारी हिंदुस्थानचा किनारा सोडून जाण्यापूर्वीच असला उतावळे- पणा करणें हें आपल्या कारस्थानास शोभत नाही म्हणून कदाचित् डि. मॅजिस्ट्रेट