पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायश्चित्ताच्या वेळींच नवं पाप १४१ मद्रासच्या ब्यूरोक्रॅटांना आपले नारसिंहरूप दाखविण्याची कितीहि आतुरता वाटत असली तरी त्यांनी दिल्लीस चाललेल्या शांतरसप्रधान नाटकाचा असा एका झटक्यासरशी रसभंग करावयाचा नव्हता! दिल्ली नगरांत शांतिपाठाचे किती गोडवे गाइले जात होते, ड्यूकसाहेब काकुळतीने सांगत होते की, बाबांनो, उगीच मागल्या आठवणी काढून मनःसंताप का करून घेतां ? आतां हा नवा मनु सुरू झाला, यांतील शांतिसुखाची गोडी चाखा. व्हाइसरॉयहि आढ्यतेने बजावीत होते कीं, एकतंत्री सत्तेला कायमची मूठमाती दिली, आतां यापुढे सर्व कारभार लोकप्रतिनिधींच्या तंत्राने चालावयाचा! आणि या मोहक अभिवचनावर जनतेचा विश्वास बसावा म्हणून ना. शास्त्री व खासदार जमना- दास यांच्या ठरावांना पहिल्याच बैठकीत अग्रपूजेचा मान देण्यांत आला. पण मद्रास इलाख्यांतील नोकरशाहीने आपल्या कृतीने दिल्लीच्या दरबारी भाषेत खरें तथ्य कितीसें असतें याचें गौप्यस्फोटन करून त्या सर्वांस तोंडघशी पाडलें ! याकूत्र हुसेन व गोपाळ मेनन यांना शिक्षा मद्रास इलाख्यांतील सुप्रसिद्ध मुसलमान पुढारी आणि खिलाफत सेंट्रल कमिटीचे सन्मान्य चिटणीस याकूब हुसेन हे गोपाळ मेनन प्रभृति तिघां अनुयायां सह मलबार जिल्ह्यांत कालिकत शहरी व्याख्यानाकरितां दौ-यावर गेले होते. त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मि. थॉमस् यांनी तत्पूर्वीच तेथें कांहीं दडपादडपी सुरू केली असल्याचीं गान्हाणी याकूब हुसेन प्रभृतींच्या कानावर आलीं होतीं व त्या गाहाण्यांचा विचार करून दाद लावून घेणे हा त्यांचा तेथें जाण्यांत हेतु होता. अनियंत्रित सत्तेस चटावलेल्या नोकरशाहीला एवढीहि धिटाई खपेना व डि. मॅजिस्ट्रेटनें एकदम सभाबंदीचा हुकूम दिला. याकूब हुसेनसारखे पुढारी व्याख्यानाकरितां इतक्या दुरून आल्याची वार्ता ऐकून हजारों श्रोते त्यांच्या तोंडचे चार उपदेशपर शब्द श्रवण करण्यास अत्यंत उत्कंठित झाले होते. अशा वेळी त्यांच्या आशेचा भंग झाल्यास शांततेचाहि मंग होईल अशी याकूब हुसेन यांस धास्ती वाटून त्यांनी कांहीं तरी सांत्वनपर चार गोष्टी सांगून त्यांची समजूत पाडण्याचा विचार ठरविला. परंतु डि. मॅजिस्ट्रेट निमित्तालाच टपलेले; त्यांनी लगेच दुसरा हुकूम काढून चौघांहि पुढाऱ्यांना गिरफदार करून आपल्यासमोर आणविले आणि बदमाष उडाणटप्पूंच्या बंदोबस्ताकरितां जें कलम क्रि. प्रो. कोड- मध्यें घातलेले आहे त्याचा नेहमीप्रमाणेंच दुरुपयोग करून सहा महिने शांतताभंग न करण्याविषयी दोन-दोन हजारांचा जामीन देण्याला फर्माविलें. असला हा अन्या- याचा, बळजबरीचा आणि उपमर्दकारक प्रकार पाहून याकूब हुसेन प्रभृति चौघांहि पुढा-यांनी जामिनकी देण्याचे साफ नाकारले आणि मॅजिस्ट्रेटनें त्यांस सहा महिन्यांची सजा देऊन सरकारच्या पाहुणचाराकरितां कानानोरला त्यांची पाठवणी केली !