पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध स्थानचें आंगणहि पुरेनासे झाले. अर्थातच नोकरशाहीस कळून चुकले की, ही चळवळ उपेक्षावस्थेच्या पुढे गेली असून तिला प्रत्यक्ष विरोधच केला पाहिजे. दडपशाहीचें हत्यार बाहेर निघालें प्रत्यक्ष विरोध करून ही चळवळ चिरडून टाकावयाचा मनांतून निश्रय झाला तरी नोकरशाहीला कात्रीत सांपडल्याप्रमाणे झाले. हिंदुस्थानांतील बहुमत- दर्शक राष्ट्रीय सभा नवीन सुधारणा स्वीकारण्यास तयार नाही, कारण ती सुधा- रणा अगदीच कवडीमोल नसली तरी दमडीमोल आहे व तिच्या योगानें पंजा- बच्या व खिलाफतीच्या जखमा बऱ्या होऊं शकत नाहीत, हे जगजाहीर झाले असतां या नोकरशाहीने स्वतःचे डोळे मिटून इंग्लंडला आंधळे बनविण्याचे पाप केले आणि हिंदुस्थानांतील जनता नव्या कायदेकौन्सिलांवर सर्वत्र बहिष्कार घालीत असतां ह्रीं कौन्सिले उघडण्याच्या समारंभाचें नाटक करण्याचे ठरवून कनॉटच्या ड्यूकसाहेबांना सूत्रधार होण्याला पाचारण केलें. हेतु हा की, एवढे मोहरे इरेस घातले असता आपल्या पाठीमागचा शह चुकेल. पण नोकर- शाहीचा हा डाव तिलाच बाधक झाला. हिंदुस्थानांतील सर्व जनता नवीन सुधारणा स्वीकारण्यास उत्सुक असून आपल्या आगमनाची चातकाप्रमाणें मार्गप्रतीक्षा करीत आहे, अशी बतावणी करून ड्यूकसाहेबांना इकडे आणविले असल्यामुळे आतां त्यांच्या डोळ्यादेखतच धरपकड कशी सुरू करावी असें तिला कोर्डे पडलें, आणि एकदाचें हें नाटक संपून मुंबईच्या बंदरावर भरतवाक्य म्हणेपर्यंत दडपशाहीचे हत्यार म्यानांतून बाहेर काढावयाचें नाहीं असा नोकरशाहीने आपला कार्यक्रम ठरविला होता. पण अंगांत कायमचा मुरलेला दडपशाही उद्दामपणा नाटकाची बतावणी संपेपर्यंत आवरून धरण्या- इतकेंहि आत्मसंयमन नोकरशाहीला नसल्यामुळे तो मधून मधून चोरून मारून प्रगट होतच होता, आणि पडद्याबाहेर शांतिपाठाचा घोष चालू असतांहि पडद्याच्या आंतून शस्त्रांचा खणखणाट कानावर आल्याविना राहात नव्हता. कोठें शेतक- यांच्या जमावावर गोळीबार कर, कोठें विद्यार्थ्यांना छड्या मार, कोठें सभाबंदीचा हुकूम सोड, तर कोठें अटक नदी ओलांडण्यास अटक कर असली भावी झगड्याची रंगीत तालीम पडद्याआड चालूच होती. ड्यूकसाहेब मुंबईच्या बंदरांतून बोटीत- पाय ठेवून केव्हां एकदां या देशाला रामराम ठोकतील आणि केव्हां एकदां आपण हे अंगीकारलेले सांग पुरे करून मनसोक्त धिंगाणा घालण्यास मोकळे होऊं असें नोकरशाहीला झाले होते. यामुळेच काकासाहेबांचा कार्यक्रम शक्य तितका आटप- शीर आंखलेला असावा. तरी पण एवढे आठ-दहा दिवसहि नोकरशाहीस वीर 'घरवेना आणि नाटकाचा दिल्ली नगरप्रवेशाचा मुख्य अंक संपतांच आपले काम झालें असें म्हणून नोकरशाहीने आवेशयुक्त उतावीळपणानें आपले दडपशाहीचें खरें नैसर्गिक उग्रः स्वरूप पुनः प्रकट केलें.