पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायश्चित्ताच्या वेळींच नवें पाप “ Even in penance planning sins aneru " - Oliver Goldsmith राष्ट्रीय चळवळीची अवस्थांतरें कोणत्याहि देशांतल्या कसल्याहि चळवळीचा इतिहास पाहण्यांत त्या चळ- वळीची चार अवस्थांतरे आढळून येतात. प्रथम तिरस्कारपूर्वक दुर्लक्ष, पुढे प्रत्यक्ष विरोध, त्यानंतर तडजोड आणि अखेरीस यशःप्राप्ति असे हे अवस्थाचतुष्टय असतं. कोणत्याहि नव्या चळवळीचा उदय झाला की, उगाच चार उपड्यापी मंडळींनी ही दुरदर लावली आहे असा शिक्का तिच्या कपाळावर प्रतिपक्षाकडून आरंभी मारण्यांत येतो. या तिरस्कारावस्थेतून ती टिकली आणि दिवसेंदिवस तिचें बाळसें वाढत चालले म्हणजे प्रतिपक्षांकडून प्रत्यक्ष विरोध होऊन झटापटीस प्रारंभ होतो. या विरोधकालांतच त्या चळवळीला खरी कसोटी लावली जाते आणि ‘हेम्नः संह्रक्षतेह्यग्नौ विशुद्धिः श्यामिकापिवा' या न्यायाने कलहाग्नीत जे टिकेल ते खरें सोनें, नाही तर तें सोनपितळ असा निर्णय होतो. प्रतिपक्षाला चारीमुंडे चीत करण्याची आशा नष्ट झाली आणि उलटपक्षी तोच आपल्या छातीवर बसेल की काय अशी धाकधूक वाटं लागली म्हणजे तिसरा तडजोडीचा अवस्थाकाल आला असे समजावे. यावेळी चळवळवाले जर अल्पसंतुष्ट असतील अथवा त्यांच्या अंगीं आत्मप्रत्ययाचा अभाव असेल तर ते 'त्वयार्ध मयार्ध' या तडजोडीला कबूल होतात. परंतु आणखी थोडी कळ सोसल्यास सगळेच फळ आपल्या पदरांत पडेल आणि तितकी कळ सोसण्याचें बळ आपल्या अंगी आहे असा ज्यांस दृढ विश्वास असतो ते या ‘त्वयार्धे मयार्धे 'ला न जुमानतां ती चळवळ तशीच पुढे चालवून शेवटची यशःप्राप्तीची पायरी गांठतात. हिंदुस्थानांतील राष्ट्रीय सभेची चळवळ पहिल्या तीन अवस्थांतरांतून निभावून चवथ्या प्रदेशांत आली आहे; आणि या शेवटच्या झटापटीत तिच्या पोटांतून असहकारिकतेची उपचळवळ प्रगट झाली आहे. या असहकारितेच्या चळवळीने तर सहा महिन्यांच्या आंतच पहिला पल्ला आक्रमून दुसऱ्या प्रदेशांत प्रवेश केला आहे. या चळवळीचा जन्म होऊन तिचें नामकरण होतें न होतें तोच गोकुळांत वादं लागलेल्या गोपाळकृष्णाची जन्मपत्रिका वर्तविण्याच्या मिषाने जसा महाबळभट्ट पुढे आला आणि “हें मूल तुझ्या मूळावर जन्मले आहे, ते तुझ्या कुलाचा घात करील यास्तव त्याला यमुनेंत जलसमाधि दे, " असा नंदाला मानभावी उपदेश करूं लागला, तसाच उपदेश करण्यास दिल्लीचे बडे ज्योतिषी पुढे आले आणि त्यांनी या बालकाला मूखांचा राजा ठरवून तें अल्पा- युषी होईल असेंहि भाकीत केलें ! पण चार पांच महिन्यांतच हें बालक चांगलें बाळसेदार होऊन रांगृहि लागले आणि अल्पावधीतच त्याच्या रांगण्याला हिंदु-