पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध करण्याचा अधिकार ठेविला आहे' एवढ्या समजुतीवरच त्यांनी त्यासहि आपली संमति देऊन टांकिली ! यानंतर बादशहा सातवे एडवर्ड परलोकवासी होऊन पंचम जॉर्ज राज्यारूढ झाले. या सभारंभाच्या वेळीं राजकीय कैद्यांना बंधमुक्त करावें अशी मोर्ले यांनी शिफारस केली; परंतु मिंटोनी तीहि अमलांत आणली नाही. मोर्लेसाहेबांच्या आठवणीं 'तला दडपशाहीसंबंधी अभिप्राय व असल्या पद्धतीविषयींचा त्यांचा तिटकारा यांस अनुसरून असलेले उल्लेख वर दिलेच आहेत. यावरून त्याचा हल्लीच्या नव्या दडपशाहीविषयीं काय अभिप्राय पडेल हे उघड दिसतच आहे. परंतु मोर्लेसाहेब स्वतः स्टेट सेक्रेटरी असतां त्यांना धाब्यावर बसवून ज्या व्युरॉकसीनें आपली दडपशाही चालूच ठेविली ती व्युरॉक्रसी मोर्ले यांच्या 'आठवणी'ला कितपत मान देणार ? तरी पण यावरून उदारमतवादी ब्रिटिश मुत्सद्द्यांच्या मतानें देखील व्युरॉक्रसीची कृत्यें किती तिरस्कारार्ह आहेत ते दिसून येतें. मग हिंदी लोकांना ही दडपशाही याज्य व निषेधार्ह वाटल्यास त्यांत नवल ते काय ? प्रायश्चित्ताच्या वेळींच नवें पाप [ हिंदी जनतेचें सांत्वन करण्याकरितां ड्यूक ऑफ कनॉट यांना बादशाहांनीं शिष्टाईसाठी पाठविलें व त्यांनी दिल्लीच्या दरबारांत 'झालें गेलें तें विसरा, नव्या मनूंत आतां असली दडपेगिरी घडणार नाहीं' असे म्हणून नोकरशाहीच्या हातून मार्गे घडलेल्या अत्याचाराच्या पापाचद्दल शाब्दिक पश्चात्तापाचें प्रायश्चित्त घेतलें. पण ही शिष्टाई तिकडे चालू असतांनाच, ड्यूकसाहेब परत बोटीवर चढेपर्यंतहि धीर न धरतां मद्रास सरकारने याकूब हुसेन व गोपाळ मेनन या दोघां पुढाऱ्यांवर भाषणबंदीचा हुकूम फर्मावून व जामीन मागून खटला भरला आणि त्यांना सहा महिने कारावासाची सजा दिली. या दडपशाहीचा या लेखांत तीव्र निषेध असून नोकरशाहीचा नैसर्गिक उद्दामपणा समूळ निपटून काढण्याला स्वराज्याचे खरे हक्क संपादन करणे व त्यासाठी निकराची चळवळ स्वार्थत्यागपूर्वक व धिटाईनें चालविणे किती आवश्यक आहे याचा ऊहापोह या लेखांत आहे. ] ( केसरी, दि. २२ फेब्रुवारी १९२१ )