पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुळ्या मुलांचा तोंडवळा अगदी हुबेहूब एकसारखा असल्यावर आईकडूनहि क्वचित् प्रसंगी सोम्याने केलेल्या खोडीचें प्रायश्चित्त गोम्याला दिले जातें. इतरांची चूकभूल होईल, पण प्रत्यक्ष आईची चूकभूल कशी होईल, असें वाटण्याचा संभव आहे; परंतु तसा प्रकार घडल्याचा दाखला सर्वप्रसिद्ध आहे. कै. तात्यासाहेब केळकर यांनी आपल्या लेखांची निवड करून त्यांचें प्रकाशन केले, त्यांत श्री. ग. वि. केतकर यांचे कित्येक लेख तात्यासाहेबांनी स्वतःचे समजून प्रसिद्ध करून टाकले ! त्याच लेखसंग्रहांत माझाहि एक लेख समाविष्ट झालेला आहे ही गोष्ट आजपर्यंत जाहीर रीतीनें मीं प्रकट केली नव्हती; पण अशी चुकभूल होऊं शकते, याचा पुरावा म्हणून येथें त्याचा उल्लेख करीत आहे. 'सोन्यासारखी संधि गमा- वली' हा दि. १२ डिसेंबर १९१६ च्या केसरीतला माझा अग्रलेख केळकरांच्या लेखसंग्रहांत समाविष्ट झाला आहे. एका शंकेचे निरसन हा इतका तपशीलवार ऊहापोह करण्याचें कारण असे की, माझा दुसरा एक अग्रलेख असाच केसरींतील निवडक लेख खंड ३ यांत छापला गेला असून, तो लेख टिळकांचा असावा अशी शंका प्रस्तावना-लेखक श्री. ग. वि. केतकर यांनीं प्रदर्शित केली आहे. प्रस्तुतच्या लेखसंग्रहांतील पृ. १०९ वर छापलेला करायला गेला एक, झाले भलतेंच' हा तो लेख होय. बेझंटबाईवर स्थानबद्धतेचा हुकूम बजावल्यावर दि. २६ जून १९१७ च्या केसरीं- तला हा अग्रलेख आहे. या अग्रलेखाची भाषा व त्यांतील विचारसरणी टिळकांची दिसते, असें श्री. केतकर म्हणतात. पण या संबंधांत माझी स्मरण- शक्ति मला फसवीत नसेल तर, तो लेख माझ्या हातचा आहे, असे मी दाखवून देऊं शकतों. बेझंटबाईवर स्थानबद्धतेचा हुकूम फर्मावल्याची वार्ता कळतांच स्वतः लो. टिळकांनी बेझंटबाईंवर हल्ला या मथळ्याखाली दि. १९ जूनच्या केसरींत अग्रलेख लिहिला. त्याच वेळीं श्री. तात्यासाहेब केळकर यांनी मद्रासला बेझंटबाईना भेटण्यास जावें असें ठरलें. मुंबईहून श्री. हॉर्निमन व पंढरीनाथ काशीनाथ तेलंग आणि पुण्याहून श्री. तात्यासाहेब केळकर अशी मंडळी मद्रासला गेली. श्री. केळकर मद्रासला गेलेले, लो. टिळकांनी याच विषयावर मागील केसरींत एक लेख लिहिलेला आणि प. वा. दादाभाई नौरोजी यांच्या निधनानिमित्त लेख लिहिण्याचें काम लो. टिळकांना त्याच दिवशी करावयाचें होतें, अशा बनावामुळे दि. २६ जून १९१७ चा लेख लिहिण्याची जोखीम मजवर पडली व मीं तो लेख लिहिला. श्री. केतकर आपल्या प्रस्तावनेंत म्हणतात की, त्या लेखांतील कांहीं वाक्यांची रचना व विचारसरणी टिळकांची दिसते. त्यांचें हें अनुमान अगदी खरें आहे. पण त्याचा खुलासा असा की, दि. १९ च्या केसरीत टिळकांनी जो पहिला लेख या विषयावर (