पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखाची निवड करण्यातील धोरण प्रकाशनाची पार्श्वभूमि केसरी वृत्तपत्रांतून गेल्या तीस-चाळीस वर्षांत मी जे लेख लिहिले त्यांतील कांही निवडक लेख पुस्तकरूपाने एकत्र छापून प्रसिद्ध करावे, अशी सूचना अनेक मित्रांनीं व यापूर्वी अनेक वेळां केली असतां मीं त्याकडे लक्ष दिले नाहीं. प्रसंगा- नुरोधानें लिहिलेला एखादा लेख, त्या वेळच्या वाचकांस आवडला असला तरी, भिन परिस्थितींत आणि रुचिपालट झालेल्या वाचकांस पुनश्च वाचावासा वाटेल का नाही, याचे उत्तर अनिश्चितच असतें. या संबंधांतला आजवरचा अनेकांचा अनुभवहि फारसा प्रोत्साहजनक नाहीं. अशा परिस्थितींत स्वतःवर नसती जबाब- दारी घेऊन, वाचकमित्रांनाहि एक प्रकारें अप्रत्यक्ष भीड घालणें उचित नव्हे, असे वाटत असल्यानें आजवर या प्रसिद्धीकरणाचा विचार मीं अंगाबाहेर टाकला होता. परंतु केसरी छापखान्याचे व्यस्थापक श्रीयुत आत्माराम रावजी भट यांनीं कांहीं सद्धेतु मनांत धरून हे लेख प्रसिद्ध करण्याची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली आणि माझे कित्येक लेख पुस्तकरूपानें प्रसिद्ध व्हावे अशी बऱ्याच वाचकांची तीव्र इच्छा आहे याविषयी त्यांनी स्वतःला खात्री पटल्याचें आग्रहाने सांगितले. अशा रीतीने माझ्यावर अथवा केसरी संस्थेवर कोणतीहि जबाबदारी न पडतां जर हें कार्य तडीस जात असेल आणि त्याचा सदुपयोग होणार असेल, तर लेखांची निवड करणे आणि त्यांना व्यवस्थित रूप देऊन त्यांचीं मुद्रितें तपासणें, एवढे परि- श्रम घेण्याला नकार देण्याचा दोष विनाकरण अंगावर कोण घेईल? यामुळे साह- जिकपणेंच मी या कार्याला रुकार दिला आणि केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त श्री. अण्णासाहेब भोपटकर आणि श्री. गजाननराव केतकर या उभयतांनीं केसरींतील माझे लेख पुस्तकरूपानें पुनर्मुद्रित करण्याला बिनशर्त परवानगी दिली. अशा रीतीनें या प्रकाशनाची पार्श्वभूमि तयार झाल्यावर लेखांची निवड करण्याचें जोखमीचें काम मजवर येऊन पडलें. ही जोखीम दोन प्रकारची होती. अनेक लेखकांच्या लेखसमूहांतून आपला लेख नेमका निवडून काढणें है काम कांही वाटतें तितकें सोपें नाहीं. तीस-चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेला लेख, इतर कोण- त्याहि लेखी पुराव्याच्या अभावी निवडून काढतांना अनेक वेळां गफलत होते. विशिष्ट विषयावरील स्वतंत्र लेख शोधून काढणें फारसें कठीण नाहीं. पण नाम- निर्दिष्ट न केलेले अग्रलेख चाळून पाहूं लागल्यावर मनाचा गोंधळ होऊं लागतो. केसरीच्या संपादकीय लेखांतला जो प्रशंसनीय गुण म्हणून नोवाजला जातो, तो गुणच या निवडीच्या कार्यात मोठी अडचण उत्पन्न करण्यास कारणीभूत होतो. केसरींतील अग्रलेखांचा लेखक कोणीहि असला तरी त्या लेखाच्या तोंडवळ्यांत बराच सारखवर्ट- पणा असतो. असा हा समान तोंडवळा एरवीं एक प्रकारें कौतुकास्पद असला तरी लेखांची निवड करतांना तो भ्रांतित चमत्कार निर्माण करण्याला कारणीभूत होतो.