पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोर्लेसाहेबांच्या आठवणी १३३ झाले की, त्या वक्त्याला विवक्षित मर्यादेत भाषण करण्याची बंदी करण्याचा अधिकार अधिकार पदावरील अधिका-याला देणे म्हणजे तर दडपशाहीची कमाल झाली म्हणावयाची ! यापेक्षां आम्हांस नावडत्या वक्त्यांना फांसावर चढवावयाचा अधिकार पाहिजे असेंच को स्पष्ट म्हणाना ! जीव तळमळू लागला या पत्रव्यवहाराने प्रेस-अॅक्टची कल्पना त्या वेळेपुरती मागे पडली. पुढे लवकरच पहिल्या 'बॉबगोळ्या'चा स्फोट झाला. ती बातमी ऐकल्या- बरोबर मोर्लेसाहेबांना फिरून दडपशाहीचा सुळसुळाट होण्याची धास्ती पडून ते लिहितांत – “या वेळी तुम्ही दडपशाहीचा अंगीकार कराल हे उघड आहे. परंतु तुमच्या दडपशाहीला शक्य तितके मागे खेचणें हे माझें कर्तव्य आहे. या वेळी आपण जोमानें व नेटाने वागले पाहिजे हे खरे. परंतु जोम व नेट म्हणजे कत्तल नव्हे ! एक राजद्रोहात्मक चोपडे लिहिल्याच्या किंवा प्रसिद्ध केल्याच्या घोर अपराधा- बद्दल सात वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा दिल्याचे ऐकून माझा जीव तळमळूं लागला आहे. ते चोपडें व त्या खटल्याची हकीकत तरी माझ्याकडे पाठवून द्या. कांहीं राजकीय अपराध्याना फटके मारण्यांत आले असे कळते ! हे कृत्य बेकायदा आहे; निदान नवीन दुरुस्तीप्रमाणे तरी तें बेकायदा ठरेल. हिंदुस्थानांतल्या अम्मलबजा- वणीखाल्याच्या अधिकाऱ्यांना कायदेपंडित पाहिला की, चीड येते, असें एक गृहस्थ मजजवळ म्हणाले. त्याबरोबर मी त्यांस उत्तर दिले की, या अधिका-यांना कायदेपंडिताची चीड येत नाही तर त्यांना कायद्याची चीड येते ! याकरितांच तर नव्या दडपशाहीच्या बिलांत वकिलांची भगभग ठेवण्यांत आलेली नाही हे उघड सिद्ध होत नाही काय ! ” बाँबचा स्फोट झाल्यावर व्हाइसरॉयांनी आपल्या छोट्या प्रेस-अॅक्टचें घोडे पुढे दामटले. या वेळी लॉर्ड मोर्ले यांना व्हाइसरॉयांची ही मागणी अगंदींच धुडकावून देतां येईना, तेव्हां त्यांनी सर लॉरेन्स जेकिन्स् यांचे मत घेऊन त्यांत मुख्य फेरफार असा केला की, अधिकाऱ्यांच्या जप्तीच्या हुकूमावर त्यांनी हाय- कोर्टाकडे अपील ठेविलें. या छोट्या प्रेस-अॅक्टांत खुनाला, स्फोटक द्रव्याचा उपयोग करण्याला किंवा दुसरे एखादे बेकायदा बळजोरीचें कृत्य करण्याला जर चिथावणी दिली जाईल तरच छापखान्याची जप्ती व्हावी असे कलम होतें. अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणे वाटेल त्याकडून व वाटेल त्या सबबीवर जामीन घेण्याचे कलम यांत नव्हते. या मर्यादेमुळे आणि बिकट परिस्थिति जाणून मोर्ले यांनी या बिलाला संमति दिली. लॉर्ड रिपन हे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्याचे चहाते असल्याने त्यांनी या बिलाला विरोध केला, पण त्या वेळी ना. गोखले व रमेशचंद्र दत्त हे उभयतांहि विलायतेंत असून त्यांनी या बिलाला संमात दिली ! अशा रीतीने इतकी वर्षे पाळ-