पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध " लेल्या आपल्या व्रताचा हळुहळू भंग होत चालला असंच मोर्लेसाहेबांना वाटून ते लिहितात, “हिंदुस्थानच्या बाबतीत मी जो व्रतभंग केला याबद्दल मला परलोकांत काय शिक्षा भोगावी लागेल ती लागो. परंतु निदान या बिलाच्या बाबतींत तरी गोखले व दत्त यांची अनुमति मिळाल्याकारणानें मला तेवढ्यापुरती स्वर्गात जागा मिळाली पाहिजे ! " मोर्ले यांच्या अनुमतीने हा छोटा प्रेस-अॅक्ट १९०८ च्या जून महिन्यांत जुन्या कायदेकौन्सिलांत पसार झाला. अस्वस्थतेला हेच धर्मेडखोर कारण आहेत एवढ्यानें हिंदुस्थानांतल्या ब्युरॉकसीचें समाधान झालें नाहीं; आणि लॉर्ड मिंटो यांनी तर एकदा आपल्या पत्रांत असे उद्गार काढले की, "हिंदुस्थानवर आमची सत्ता अबाधित चालण्याच्या मार्गात इल्ह्रींचें हाऊस ऑफ कॉमन्स हा मोठा धोका आहे.” त्या वेळी लॉर्ड मोर्ले यांना सात्विक संताप येऊन ते उलट प्रश्न करितात की, “ हाऊस ऑफ कॉमन्सने तुमचें काय घोडे मारले आहे ? बाँबचा स्फोट होतांच तुमच्या ‘एक्सप्लोझिव्ह अॅक्टा 'ला संमति दिली. हिंदुस्थान सरकारला आपल्या इच्छेनुरूप कोणताहि उपाय योजून अमल करण्याला पूर्ण मुभा जर न मिळेल तर केंव्हां कसा प्रसंग ओढवेल नेम नाही असे तुम्ही लिहितां. फुलरसाहेबांचें तरी हेच मागणें होतें; मग त्यांचा तुम्ही राजिनामा कां स्वीकारला ! असली 'पूर्ण मुभा' देणें हें कायद्याच्या व राज्यपद्धतीच्या तत्त्वाला व नियमालाहि विरुद्ध आहे. तुम्ही म्हणतां कीं, हिंदुस्थानांस कसें वागले पाहिजे याची आम्हांस जास्ती माहिती आहे. यावरून तुमच्या दीडशहाण्या कौन्सिलरांपेक्षां ॲस्क्विथ, ग्रे, लोरबर्न व मोर्ले यांना अक्कल कमी आहे असेंच मानावयाचेंना! आणि तेथल्या ब्युरॉक्रसीचे शब्द म्हणजे वेदवाक्य असें मानावयाला त्या शहाण्यांना तरी हिंदी लोकांची राहणी व स्वभाव यांचे ज्ञान कित- पत झालें आहे ! हल्लीं त्या देशांत जी अस्वस्थता माजली आहे तिला हिंदुस्थानवर पन्नास वर्षे अंमल चालविणारे हेच घमेंडखोर कारणीभूत नाहीत काय ? त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची मी तारीफ करितों. परंतु ब्रिटिश मंत्रिमंडळ म्हणजे मूर्खाचा बाजार आहे असें जें या ब्युरॉक्रसीला वाटते तें मी कधींद्दि सहन करणार नाही. "} वरील पत्रांत मोर्लेसाहेबांनी ब्युरॉक्रसीच्या अंगच्या दोषाचे स्पष्ट विवरण करून त्यांच्या चुकांच्या धोरणामुळेच अशांतता पसरली असे आपले मत दिले. त्यानंतर दि. २४ जूनच्या पत्रांत त्यांनी इशारा दिला की, "अमेरिकेत जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी वसाहतवाल्यांना चिडविले आणि तेथली खरी स्थिति न कळवितां मंत्रिमंडळाचा गैरसमज केला, यामुळे अमेरिकन वसाहती हातच्या गेल्या. रिकामा डौल कशाला ? "" लो. टिळकांच्या खटल्यानंतर मुंबईस जो दंगा झाला त्यांत नुसत्या दगड फेकल्याच्या आरोपावरून १२ महिन्यांची शिक्षा झालेली ऐकून व त्याच वेळी तिने-