पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोर्लेसाहेबांच्या आठवणी १३१ "" सांपडतील. यास्तव कोणताहि कडक उपाय योजण्यापूर्वी साधकबाधक प्रमाणांचा विचार करा आणि जेथें शक्य असेल तेथे मला आगाऊ कळवा. विशेषेकरून वर्त- मानपत्रासंबंधी कांहीं मुस्कटदाबीचा विचार असेल तर तो मला जरूर अगोदर कळवा. इजितमध्ये लॉर्ड क्रोमर यांनी वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली नाहीं ही गोट विशेष नांवाजली जात आहे. राजद्रोही वर्तमानपत्रे जर खरोखरीच सैन्यांत फितुरी करण्याचा यत्न करतील तर त्यांना खुशाल दडपून टाका. परंतु असल्या बांदलीच्या वेळी नुसती शंका येणें म्हणजेच खात्री होणे आणि शक्यता म्हणजेच प्रत्यक्ष कृति असे वाटू लागतें, यास्तव तेवढ्याला नीट जपा. या एका सूचनेंत साप साप म्हणून भूई घोपटण्याचा संभव कसा असतो तें मोर्लेसाहेबांनी दिग्दर्शित केले आहे. पण येथे काय पालथ्या घड्यावर पाणी ! १८१८ चा जुना रेग्युलेशन उकरून काढून लजपतराय यांस हद्दपार करण्यांत आलेच. ही बातमी कळतांच मोर्लेसाहेब लिहितात, आयर्लंडमध्ये दडपशाही केली नाही यावरून मी दडपशाहीचा कहा द्वेष्टा आहे अशी जर पार्लमेंटच्या सभासदांची खात्री नसती तर मला या कृत्याचें समर्थन करणे जड गेलें असतें. आणि बाल्फोरसाहेबांनी वुइ- ल्यम ओब्रायन यांस अटकेत ठेवल्याबद्दल त्यांच्यावर जो मी पूर्वी तुटून पडलों होतो तोच मी आतां या कृत्याचें समर्थन करूं लागलों तर लोक मला काय म्हण 'तील ! आतां तुम्ही हें १८१८ सालचें जुनें हत्यार बाहेर काढलेच आहे; तर मग त्याचा तुमच्याच दोघां कौन्सिलरांवर (नांवें दिलेली नाहींत ) प्रयोग करून त्यांनाच हद्दपार कराना ! म्हणजे कटकट मिटली! तसे कराल तर मात्र मी तुम्हांस मोठ्या उत्सुकतेने दुजोरा देईन." 6" अंगावर शहारे आले लजपतराय यांच्या हद्दपारीला दोन महिने झाले नाहींत तोच मोर्लेसाहेब लिहितात - " सुधारणेचा खलिता जेव्हां प्रसिद्ध करण्यांत येईल त्याच वेळी लजपत- रायांची हद्दपारी रद्द करावी हे योग्य दिसतें. आम्ही इंग्लिश लोक क्षमा करण्याला नेहमीं नाखुष असतो हा आमचा स्वभावच आहे. त्यांतून राजकीय कैद्यांवर तर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा फारच डोळा असून त्यांना ते कडक व निर्दयपणे वागवितात हे अनुचित आहे. " एका पत्रांत व्हाइसरॉयांनी संशयित पत्रव्यवहार फोडून पाह- ण्याची पद्धति सुरू करण्याचा विचार कळविला; त्यावर मोर्लेनी लिहिले की, “याचा मला पुष्कळ अनुभव आहे आणि त्या अनुभवावरून माझें असें ठाम मत आहे की, हा उपद्व्याप बहुतांशी निष्फळ ठरतो." त्यानंतर व्हाइसरॉयांनी पहिली 'प्रेसलॉ' ची प्रत मोर्लेसाहेबांकडे पाठविली. त्यांत मोर्ले लिहितात - "असला कांही तरी कायदा करावा लागेल असें मलाहि वाटू लागले आहे; परंतु तुमच्या कायद्याची कलमें चाचून माझ्या अंगावर शहारेच आले ! "