पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध जारीने पुढे आल्यामुळे दडपशाहीविषयी मोर्लेसाहेबांना किती तिटकारा वाटत होता आणि राज्यकारभारांत दडपशाहीचें धोरण अखेरीस कसे निष्फळ ठरते, याविषयीं त्यांनी जे आपले अनुभवसिद्ध मत दिले आहे, त्याचा हल्लींच्या अधिकाऱ्यांनी विचार करणें अगल्याचे असल्यानें 'मोर्लेसाहेबांच्या आठवणीं 'तून त्यासंबंधाचे त्यांचे उद्गार पुढें देत आहों :- हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत सुधारणा करण्याच्या हेतूने नवी योजना तयार करून खलिता रवाना करण्याकरितां लॉर्ड मोले यांनी लॉर्ड मिंटो यांस जेव्हा अगदी निकड लाविली या वेळी व्हाइरॉयकडून एकदांचा पहिला खलिता सादर झाला. त्यांत ब्युरॉक्रसीच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें हिंदुस्थानांत राजद्रोहाचा सुळसुळाट आहे, सबब सुधारणांचा प्रश्न तूर्त हाती घेऊं नये अशा अर्थाचा एक प्यारा होताच. तो वाचन त्यावर मोर्ले लिहितात " हा प्यारा लिहिणारे लेखक मजसमोर असते तर त्यांस मी असा सवाल केला असता की, 'हिंदुस्थानांत राज्यद्रोह पसरविणारे लोक आहेत व हिंदी लोकांची मनें बिथरली आहेत हे जर खरें असेल तर सुधारणा लवकर अमलांत आणण्याची आवश्यकता जास्तच सिद्ध होते; हीं बिथरलेली मनें ताळ्यावर आणण्याला तुम्ही दुसरा कोणता मार्ग स्वीकारणार तें सांगण्याची आणि तो अधिक यशस्वी होईल हें सिद्ध करण्याची जबाबदारी तुम्हांवर आहे; ' यास्तव मला तुमचा दुसरा मार्ग काय तो सांगा. या एका वाक्यांतच मोर्लेसाहेबांनी राज- द्रोहाचें बुजगावणें दाखवून राजकीय सुधारणा मागे खेचणारांस चोख उत्तर दिले आहे. अर्थातच ब्युरॉक्रसीचा हा पहिला डाव सपशेल फसला. "" दडपशाहीनें अस्वस्थता फैलावते त्यानंतर पंजाबांतील अस्वस्थतेची वार्ता विलायतेंत जाऊन धडकली; तेव्हां मोर्लेसाहेबांना क्षणभर विचार पडला. परंतु त्यांनी ताबडतोब व्हाइसरॉयांना इषारा दिला तो असा - " एकंदरीत आपण सुधारणेची योजना ठरविली आहे ती अंमलांत आणणे कठिण जाणार असे दिसतें, पण हा अनुभव जुनापुराणाच आहे. राज्यकारभारांतील दोष व उणीव यामुळे अस्वस्थता माजते. अस्वस्थता माजतांच सुधारणा करूं इच्छिणारांच्या डोक्यावर तिचें खापर फुटते. आणि सुधारणेची योजना मार्गे मागे पडते. अर्थातच दडपशाहीला स्फुरण चढते आणि दडपशाहीमुळे अस्व- स्थता कमी होण्याच्या ऐवजी जास्तच फैलावते. असा हा चक्रनेमिक्रम आहे. तुम्हांला उपाय योजावयाची गरज पडेल तर त्यास मी पाठिंबा देईन; पण ज्याप्रमाणे राज- द्रोही इसमाविरुद्ध कडक उपायांची जरूरी भासते त्याचप्रमाणे तुमच्या 'कडेकोट बंदोबस्ती' अधिकाऱ्यांवरहि कडक नजर ठेवावी लागते. कारण क्रांतिकारकांच्या मूर्खपणाची जगाच्या इतिहासांत जितकीं उदाहरणें सांपडतील तितकी तरी या बंदोबस्ताचें वेड लागलेल्या राजेश्रींच्या हातूनहि मूर्खपणा घडल्याची उदाहरणें