पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोर्लेसाहेबांच्या आठवणी १२९ हा विचार मि. लॉईड जॉर्ज यांच्या अंतःकरणांत जागृत असल्याचे उघड दिसतें. मग त्याच मात्रेचा हिंदुस्थानवरहि प्रयोग करण्यास ते माघार कां घेतात : आय- रिश कन्व्हेन्शनची योजना अद्यापि जाहीर व्हावयाची आहे. पण आमच्या राष्ट्रीय सभेनें 'स्वराज्याची' योजना कधींच जाहीर करून ठेविली आहे. परंतु पूर्वीचे प्रधान मि. ॲस्क्विथ काय अथवा हल्लींचे प्रधान मि. लॉईड जॉर्ज काय, हिंदुस्थान- च्या प्रश्नासंबंधी अद्यापि अखंड मौनव्रतच धारण करून आहेत, ही खरोखरीच सखेदाश्चर्याची गोष्ट होय. मनुष्यबळाची इतकी चणचण भासत असतां न्यूफौंड- लंडसारख्या दीड लक्ष वस्तीच्या वसाहतीकडे ग्रेट ब्रिटननें सैन्याची मागणी करावी आणि असंख्य मनुष्यबळ प्रसवणाऱ्या हिंदरूपी घरच्या कामधेनूची मात्र त्यांस आठवण होऊं नये काय ? घरांत कामधेनू असतां ताक मागत जाण्याची ब्रिटिश मुत्सद्दयांची ही वृत्ति जेव्हां बदलेल तोच सुदिन खरा ! आणि हे महायुद्ध संपण्या- पूर्वी असा सुदिन उगवेल अशी आमची खात्री आहे. मोर्लेसाहेबांच्या आठवणी [ लॉर्ड मोर्ले हे लिबरल प्रधानमंडळ अधिकारारूढ असतांना १९०५ पासून १९९० पर्यंत भारतमंत्री होते. त्यांच्याच त्या कारकीर्दीत मोर्ले-मिंटो सुधारणा जाहीर झाल्या. पण त्याच वेळी दडपशाहीचे अनेक कायदेहि पसार करण्यांत आले. ग्लॅडस्टनसाहेबांचे अनुयायी आणि मनानें पक्के उदारमतवादी असे असतांना मोर्लेसाहेबांनी दडपशाहीच्या कायद्यांना संमति कशी दिली, है एक सर्वांना कोर्डेच वाटत होतें. त्या कोड्याचा उलगडा स्वतः मोर्ले यांनींच 'माझ्या आठवणी' हे पुस्तक लिहून त्या पुस्तकांत केला. तेव्हां त्या पुस्तकां तील निवडक उतारे एकत्र गुंफून मोर्लेसाहेबांना स्वतःच्या मताला बाजूला सारून दडपेगिरीला कसा पाठिंबा द्यावा लागला त्याचा खुलासा या लेखांत केला आहे.] 6 दडपशाहीचा तिटकारा 'मोर्लेसाहेबांच्या आठवणी' या पुस्तकावरून लॉर्ड मोर्ले यांनी आपल्या सुधारणांची योजना कशी अंमलांत आणली याचे दिग्दर्शन आम्ही मागें एकदां केलंच आहे. आतां सुधारणेच्या योजनेपेक्षां दडपशाहीच्या नव्या कायद्याचा प्रश्न ( केसरी, दि. ४ फेब्रुवारी १९१९ ) 4