पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध असल्या चिमुकल्या वसाहतींकडेहि ही मागणी होत आहे. आणि त्या वसाहतींहि आपल्या सामर्थ्यानुरूप मायदेशास मदत करीत आहेत. परंतु या वसाहतींची लोकसंख्या किती आणि त्यांतून आतां आणखी भरती ती काय होणार ? सगळ्या वसाहती मिळून लोकसंख्या पाहिली तरी ती २ कोटींच्या वर नाहीं. पण एकट्या हिंदुस्थान देशांत त्यांच्या १५ पट लोकसंख्या आहे. अर्थातच जेथें मनुष्यबळाचा प्रश्न आहे तेथें हिंदुस्थान कोणासहि हार जाणार नाही. परंतु ब्रिटिश प्रधानास अद्यापि हिंदुस्थानांतील मनुष्यबळाचा योग्य रीतीनें उपयोग करून घ्यावा अशी वासना होत नाही. हिंदुस्थान सरकार रिक्रूटभरती करीत आहे, सैन्य जमत आहे, रणभूमीवर जात आहे, या सर्व गोष्टी खन्या; परंतु यांत अंतस्थ आत्म- स्फूर्तीची जी ज्योत पाहिजे आहे, ती दिसून येत नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी जितके लोक जमवूं शकतील, लष्करी अधिकारी जेवढ्यांना लष्करी शिक्षण देऊ शकतील, सरकारी जहाजे जेवढ्यांना रणभूमीकडे वाहून नेऊं शकतील, तेवढ्याच हिंदी मनुष्यबळाचा युद्धाला उपयोग होणार. बाकीचें सगळे अफाट मनुष्यबळ असून नसल्यासारखेंच आहे. त्यांना जर प्रेमानें हांक मारिली, त्यांना जर या कार्यात आपलेपणा वाट्टं दिला, त्यांच्या अंगच्या नैसर्गिक महत्त्वाकांक्षेस उद्दीपित करून ती पूर्ण करण्याचा मार्ग जर मोकळा केला. तर हिंदुस्थानांतून मनुष्यबळाची कधी तरी वाण पडेल काय ? दूरदूरच्या वसाहतींना मि. लॉईड जॉर्ज असे सांगतात की, " बाबांनों, इतक्या दूर राहणाऱ्या माझ्या एकट्याच्याने काय होणार असें म्हणूं नका ! युद्धसमाप्ति होण्यापूर्वी जो जो मनुष्य रणांगणावर दाखल होईल त्या प्रत्येकास महत्त्व आहे. कारणं शेवटी पारडें जें इकडचें तिकडे उलटतें तें शेव- टच्या क्षुल्लक वजनानेंच उलटतें. "" हिंदुस्थानची आठवण कां होत नाहीं ? यावरून ग्रेट ब्रिटनला या वेळी मनुष्यबळाची केवढी गरज भासत असली पाहिजे तें उघड होते. परंतु ज्या वसाहतींची वस्ती १०-२० लाख देखील नाहीं तेथील मनुष्यबळ शक्य तितकें संपादन करण्याचा यत्न चालू असतां या संकटप्रसंग देखील ब्रिटिश प्रधानास हिंदुस्थानची आठवण होऊं नये काय ? कोणता उपाय योजला असतां हिंदुस्थानांतून जरुरीपेक्षांहि अधिक मनुष्यबळ प्राप्त होईल, याचा विचार मि. लॉईड जॉर्जसारख्या मुत्सद्द्यांच्या डोक्यांत आला नसेल काय ? असे होणें शक्य नाहीं. सक्तीचें बिल पार्लमेंटपुढे आणण्याचा प्रश्न निघाला असतां, आयर्ल- डची वाट काय ? अशी एकानें पृच्छा केली, तेव्हां हेच प्रधानमंत्री असे म्हणाले कीं, आयरिश कन्व्हेन्शननें जी होमरूलची योजना तयार केली आहे, ती जाहीर झाल्यावर मग आयर्लंडवर सक्तीचा कायदा लावण्याचा विचार पाहूं. या उत्तरा- वरून 'होमरूल देणें' व 'मनुष्यबळ मिळविणें' या गोष्टी परस्परावलंबी आहेत.