पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश घरीं कामधेनू पुढे ताक मार्ग. सैन्यांतील हुद्देदारासहि हाच दोष भोंवत आहे. हिंदी सैनिकांस सैन्यांतील वरिष्ठ अम्मलदारीच्या जागाच मिळत नव्हत्या; कोठ सहापौच जागा देण्यास प्रारंभ झाला आहे. कित्येक राजेरजवाड्यांना बहुमानाकर कंप्टन, जनरल, अशाहि पदव्या देण्यांत आल्या आहेत; पण असल्या वरोपचाराने मूळांतला राग नाहींसा कसा होणार ? ब्रिटिश सैन्यांत एखादा इसम कर्नल, जनरल, अशा पदवीस चढला म्हणजे त्याच्या अंगी दुसऱ्याला आपल्या योग्यतेस चढविण्याची शक्ति येते. ते हुद्देदार लष्करी शिक्षणाच्या कॉलेजांत इतरांस शिक्षण देऊन त्यांस अंमलदार बनवू शकतात. परंतु ज्या हिंदी राजेरजवाड्यांत ले. जनरल, मेजर जनरल असल्या बड्या बड्या पदव्या देण्यांत आलेल्या आहेत त्यांना इतरांस तसे शिक्षण देऊन परीक्षा घेऊन कॅप्टन-कर्नल होण्याच्या पात्रतेचा दाखला देतां येतो काय ? अशी शक्ति जेथें नांदत नाही तेथें सैन्याची नैसर्गिक वाढ व्हावी कशी? इंग्लिश लष्करांत शिरणाऱ्या सैनिकास आपण स्वतः सेनापति होऊं एवढेच नव्हे तर इतरांस सेनापति करूं अशी धमक असते, म्हणूनच रक्तबीज राक्षसाचे रक्तबिंदु रणांगणा- वर पडले असतां त्यांतून जसे नवे नवे राक्षस उत्पन्न होत असत, त्याप्रमाणे फ्रेंच रणभूमीवर इंग्लिश शिपायांचा रक्ताचा सडा पडतांच रक्ताच्या बिंदुगणिक इंग्लंडांतून एक एक नवा रिक्रूट आत्मस्फूर्तीने तयार होऊन पुढे येऊं लागला आणि अशा रीतीनें मूळच्या मूटभर सैन्याच्या जागी आज एकट्या इंग्लंडांतून - साडेतीन कोटींच्या छोट्या बेटांतून ४५ लक्ष मर्द लष्करांत दाखल झाले ! - छोट्या वसाहतींची मनधरणी परंतु इंग्लंडांतील सैन्यभरती झाली तरी तिला देखील कांही मर्यादा अस 'णारच. वटबीजाच्या मानानें पाइतां वटवृक्ष कितीहि अफाट विस्तार पावलेला दिसला तरी त्याची वाढ देखील कांहीं विशिष्ट मर्यादेपर्यंतच होणें शक्य असतें. इंग्लंडांतून आतांपर्यंत शेंकडा १३ वीर रणदीक्षा घेऊन रणभूमीवर दाखल झाले खरें. पण तेवढ्यानें कांहीं रणयज्ञाची परिसमाप्ति झाली नाहीं. हें रणकुंड विझण्या- च्या ऐवजी अधिकाधिक पेटतच चालले आहे. आणि त्यांत नित्य सहस्त्रावधि वीरांच्या आहुति पडत आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटिश मंत्र्यांना इंग्लंडांतील नागरिकांवर आणखी सक्ति करण्याची पाळी येण्याचें लक्षण दिसत आहे. लष्करांत दाखल होण्याची वयोमर्यादा ४० आहे ती पन्नास करावी, १९ वर्षाच्या आंतल्या तरुणांचाहि सैन्यांत प्रवेश व्हावा. ज्या युद्धोपयोगी कारखान्यांतील मजुरांना पूर्वी लष्करी भरतीच्या सक्तीची माफी होती त्यांची माफी रद्द करावी असे अनेक विचार चालू आहेत. अशा संकटप्रसंगी ब्रिटिश प्रधानमंत्री मि. लॉईड जॉर्ज यांनी ब्रिटिश वसाहतीच्या प्रधानाकडे लष्करभरतीची त्वरा करण्याविषयी संदेश धाडला आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, न्यूफौंडलंड