पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कोणत्याहि गुणाचा अभाव हिंदी सैन्यांत दिसून येत नाही. उलट तें उपाशीपोटींहि लहूं शकतात हा एक त्यांच्यांत अजब गुण आहे ! असे असतां ब्रिटिश सैन्यरूपी चटवृक्षाप्रमाणे हिंदी सैन्यरूपी वृक्ष वाढत कां नाहीं? याचे उत्तर एकच देणे भाग आहे ते हेच की, हा वृक्ष खरा वृक्ष राहिला नसून तो कृत्रिम शोभेचा वृक्ष आहे. तो आपण होऊन वाहूं शकत नाही, कारागिरास फुरसत असली व त्यानें मेहनत करून या कृत्रिम वृक्षास दोन डहाळ्या जास्त जोडण्याचें मनांत आणले किंवा पांच- चार फुलेंफळें अधिक लटकावून दिली तर तो अधिक प्रफुल्लित दिसूं लागतो. उलट- पक्षी ल्याच कारागिराने त्याची छाटाछाट केली तर तो तसाच मुंडा होऊन राहतो! डॉक्टरांचा तुटवडा कां ? व हे वर्णन केवळ अलंकारिक किंवा अतिशयोक्तीचें असें कोणास वाटेल; परंतु त्यांत काडीमात्र अतिशयोक्ति नाहीं, अथवा वस्तुस्थितिविपर्यासहि नाहीं. जो कोणी डोळे उघडून वस्तुस्थितीचें निरीक्षण करील त्यास ही गोष्ट सहज दिसून येईल. मेसापोटोमिया-प्रकरणांत या गोष्टीची शहानिशा झाली आणि कमिशनर्सनी हाच अभिप्राय दिला. यावर कित्येकांचा असा आक्षेप येईल कीं, मेसापोटोमिया- प्रकरणांत ब्यूरॉक्रसीची जी एक घोडचूक झाली तेवढ्याचा फायदा घेऊन आम्ही या राज्ययंत्रास सरसकट निरुपयोगी ठरवितों; परंतु तसा प्रकार नाहीं. या राज्ययंत्राचें परीक्षण करण्याची पूर्वी कधीं संधि आली नव्हती ती या प्रकर- जानें आली एवढेच खरें. परंतु परीक्षणाची कसोटी लावल्यानंतर त्यांत जे दोष दिसून आले ते मात्र आकस्मिक किंवा आगंतुक नसून कायमचे राज्ययंत्राच्या रचनेंतच उद्भूत झालेले असे आहेत. नमुन्यादाखल. या मेसापोटोमिया प्रकरणांतले एकच उदाहरण घेऊं. इस्पितळांचा व डॉक्टरांचा तुटवडा पडल्याने तेथील सैनिकांचे जे हालहाल झाले ते कां ? पाहिजे तर हिंदुस्थानांत लढवय्ये नसतील म्हणा, मुत्सद्दी नसतील म्हणा, आणखी काय बाटेल तो उणेपणा आमच्या पदरीं बांधा ! पण निदान हिंदुस्थानांत डॉक्टरांची तर वाण खास नाहीं; मग मेसापेटोमियांत डॉक्टरांचा तरी तुटवडा कां पडावा ? पण याचे कारण उघडच आहे. आय. एम्. एस्. ही चीज फक्त विलायतेंतील विशिष्ट कॉलेजांतच पैदा होते व तेथला शिक्का असल्याखेरीज कोणासहि हें काम द्यावयाचें नाही असा या ब्यूरॉकसीचा पूर्वीचा बाणा ! बरें, यदाकदाचित् अडचणीची वेळ असल्यानें हिंदी डॉक्टरांस आय. एम्. एस्.चा हुद्दा दिला तरी त्यांस तो कायमचा थोडाच मिळणार आहे ! बरें प्रसंगविशेषीं तीन-तीन वर्षे रखडल्यावर तोहि हुद्दा कायमचा मिळाला समजा; तरी पण तेवढ्यानें या यांत्रिक पद्धतींतला अंगभूत दोष नाहींसा होत नाहीं. हिंदी आय. एम्. एस्. यांस जेव्हां दुसन्यांस आय. एम्. एस्. करण्याची शक्ति येईल तेव्हांच त्यांची नैसर्गिक वाढ होऊं शकेल. A