पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरीं कामधेनू पुढें ताक मागें ! १२५ पेक्षां हिंदुस्थानचें सैन्य प्रथम रणांगणांत दाखल झाले. प्रारंभी ते ६०-७० हजार होतें व पुढं थोडक्याच महिन्यांत त्याची खानेसुमारी २-३ लाखांपर्यंत वाढली ! परंतु गिरणीच्या यंत्रांतून छाप मारून निघणारा माल किती निघावयाचा हें ज्या- प्रमाणे केवळ गिरणीतील यंत्रांच्या संख्येवर अवलंबून असतें, त्याप्रमाणें हिंदु- स्थानांतून किती वीर रणांगणावर जावयाचे तें या नोकरशाहीच्या लष्करी यंत्रा- च्या शक्तीवर व संख्येवर अवलंबून राहिल्यानें हिंदी वीरांची संख्या ठराविक मर्यादेच्या बाहेर जाऊं शकेना. प्रथमारंभी हिंदी सैन्य संख्येने अधिक होतें, परंतु तें स्वयंविकासी नसल्याने त्याच्या वाढीची मर्यादा खुंटली. उलटपक्षी फ्रेंच रण- भूमीवर अवतीर्ण झालेले इंग्लंडचें सैन्य प्रारंभी हिंदी सैन्यांइतकेच होते; पण ते सचेतन कोटींतले असल्यानें वटवृक्षाचा कोंब जसा फोफावत जावा आणि काला- वधीनें त्याचा जसा सनाटा वृक्ष बनावा, त्याचप्रमाणे प्रारंभी जें इंग्लिश सैन्य ६०-७० हजार होतें तें वाढतां वाढतां ४०-५० लाखांपर्यंत वाढलें ! वसाहतींच्या सैन्याचीहि अशीच वाढ झाली. या महायुद्धासाठी ब्रिटिश साम्राज्यांतील कोणत्या भागांतून किती सैनिक लष्करांत दाखल झाले याचे आंकडे नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत, ते असे - इंग्लंड ४५३००००, स्कॉटलंड ६२००००, वेल्स् २०००००, आयर्लंड १७००००, वसाहती ९००००० आणि हिंदुस्थान व आफ्रिकेतील ब्रिटिश मुलूख १००००००, हे आंकडे पाहून हिंदी लोकांस सखेदाश्चर्य वाटल्यावांचून राहणार नाहीं. या आंकड्यांत हिंदुस्थानचे आंकडे वेगळे न देतां आफ्रिकन नीग्रोंचा व हिंदी लोकांचा मिळून एक गट केला आहे, ही पहिली उद्वेगजनक गोष्ट होय. पण तो मुद्दा तूर्त अप्रस्तुत आहे. - परकीय राज्यपद्धतीचाच हा दोष वरील आंकड्यांवरून असे दिसून येईल की, इंग्लंडने आपल्या लोकसंख्येतून शेकडा १३ शिपाई सैन्यांत धाडले; स्कॉटलंडचे शेकडा १३ वीर युद्धार्थ सिद्ध झाले; वेल्समधून शेंकडा १० पट्टे शत्रूचा समाचार घेण्यास सज्ज झाले; आयर्लंड व बसा- इतीं यांनी जरी त्या मानानें लष्करी भरती केली नाहीं तरी त्यांचे प्रमाण शेंकडा ४ तरी पडतें. परंतु हिंदुस्थानचें प्रमाण काय हें सांगण्याची देखील लाज वाटेल. पण ही लाज कोणास ? हिंदी लोकांस नव्हे, तर ज्या पद्धतीने त्यांच्या अंगची नैसर्गिक विकासशक्ति नष्ट केली त्या पद्धतीसच दोष दिला पाहिजे. हिंदी लोक रणभीरू आहेत असा आरोप प्रत्यक्ष त्यांच्या शत्रूंनींहि कधी त्यांच्यावर केलेला नाहीं. त्यांच्या अंगीं सेनानायकाचें कौशल्य नाहीं असेंहि म्हणण्यास तोंड नाहीं. कारण प्रस्तुतच्या महायुद्धांतच वरील गोरा अधिकारी पतन पावला असतां हिंदी वीरांनी स्वतःच्याच हिकमतीनें शत्रूवर हल्ला चढविल्याची किंवा पलटणींचा बचाव केल्याची उदाहरणें अनेक घडून आली आहेत. सारांश, सैनिकांस आवश्यक अशा