पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध लागले होते. शिवाय हिंदी सेनाविभाग सर्व प्रकारें स्वयंपूर्ण असा होता. अर्थातच या सैन्याला शस्त्रास्त्रें, तोफखाना, दारुगोळा, वगैरे रणसाहित्याकरितां दुसन्याच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग आला नाहीं, आणि म्हणूनच या सैन्याचा तात्काल उप- योग होऊ शकला. अमेरिकेनें रणदीक्षा घेतल्यास आजमितीला वर्ष होऊन गेलें; तरी पण अद्यापि अमेरिकन सैनिकांची पूर्ण तयारी झाली नाहीं. आणि इकडे जर्म- नीच्या उठावणीमुळे प्रसंग तर आणीबाणीचा येऊन ठेपला; तेव्हां आमची स्वतंत्र पलटणे सर्वथैव सज्ज नसली तरी आम्ही फ्रेंचांच्या व इंग्रजांच्या पथकांत शिरून लढतों असे म्हणण्याची अमेरिकन सरकारवर पाळी आली. अर्थातच अमेरिकन सरकार एक वर्षांत जी तयारी करूं शकले नाहीं ती तयारी हिंदुस्थान सरकारने तीन महिन्यांतच केली, हे खरोखरीच आश्चर्यजनक आहे आणि त्याबद्दल येथील नोकरशाही प्रशंसेस पात्र आहे हे कोणीहि प्रांजलपणे कबूल करील. गंजलेले अचेतन यंत्र वर दिग्दर्शित केलेल्या गुणाबद्दल नोकरशाहीच्या या सु-राज्यपद्धतीची प्रारंभी प्रशंसा झाली खरी; परंतु अल्पावधीतच या पद्धतीचे दोष ढळढळीतपणें दिसं लागले. सचेतन सृष्टि आणि अचेतन सृष्टि यांत जितकें अंतर असतें, तितकेंच अंतर स्वराज्यपद्धतींत व स्वरराज्यरहित सुराज्यपद्धतीत असतें. सचेतन सृष्टीत तिच्याच पोटी विकासाचें बीज असतें; पण अचेतन सृष्टीत त्याचा पूर्ण अभाव असतो. निसर्गाने उत्पन्न केलेलें डाळिंब गोकाकच्या रंगीत डाळिंबापेक्षां आकाराने कदाचित् बाह्यतः तितकें डौलदार दिसणार नाही व त्याचा रंगहि तितका तुकतुकीत असणार नाहीं; परंतु त्याच्या पोटांत तसली शेंकडों डाळिंब उत्पन्न करण्याची निसर्गदत्त शक्ति असते. तें डाळिंब स्वतः नष्ट होईल, पण त्याबरोबरच शेंकडों डाळिंबांस जन्म देईल. परंतु कृत्रिम डाळिंब केवळ प्रदर्शनांत ठेवून दुरूनच पाहात बसावें. त्याच्या अंगांत कांहीं तसलेंच दुसरे एखादें फळ उत्पन्न करण्याची धमक नसते. मूळ कारागीर जिवंत असला व त्यास आवश्यक तितकी साधनें व अवधि मिळाला तर तो एकाच्या जोडीला आणखी दहा उत्तमोत्तम कृत्रिम फळे तयार करून ठेवील. पण स्वतः त्या फळांत कांहीं अशा रीतीनें विकास पावण्याची शक्ति नसते. येथील नोकरशाहांच्या राज्यपद्धतींताहे तोच दोष आहे. या राज्यपद्धतीनें तीस कोटि सचेतन प्राण्यांस जवळ जवळ अचेतन बनविले आहे. भारतमंत्री मांटेग्यू यांनी जें या पद्धतीला जुनेंपुराणें व गंजलेले अचेतन यंत्र म्हटले आहे तें कांहीं उगीच नव्हे. नोकरशाहीच्या या राज्यपद्धतींत व स्वराज्य उपभोगणाऱ्या वसाह- तींच्या राज्यपद्धतींत असलेले हे महदंतर क्रमाक्रमानें कसं ढळढळीतपणे दिसूं लागले ते पाहा. एक इंग्लंडखेरीज करून ब्रिटिश साम्राज्याच्या इतर कोणत्याहि भागांतल्या-