पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरीं कामधेनू पुढें ताक मागें ! १२३ लिहिला असून, हिंदी जनतेला जर स्वातंत्र्याची प्राप्ति होण्याची शक्यता दिसली आणि आत्मीयता उत्पन्न झाली तर एकटा हिंदुस्थानच लागेल तितकी लष्कर- भरती करूं शकेल, पण ब्रिटिश मुत्सद्दयांना अद्यापि ही सद्बुद्धि सुचत नाहीं, हें दुर्लक्षण होय, अशी टीका या लेखांत आहे. ] बोअरयुद्धाच्या वेळी इंग्लिशांचा असा बाणा होता की, गोन्या राष्ट्रांच्या झगड्यांत ' काळ्या आदमी 'ला आपल्या मदतीला घ्यावयाचें नाहीं, प्रतिपक्षावर जी काय मात करावयाची ती आमची आम्ही करूं; आमच्या यशांत दुसरा कोणी वांटेकरी नको ! मूठभर बोअर लोकांस चिरडून टाकण्यास प्रबळ ब्रिटिश राष्ट्र सर्वस्वी समर्थ असल्यानें ब्रिटिशांचा हा पण त्या वेळी सिद्धीस गेला. तथापि त्या वेळच्या कटु अनुभवानें असो, अथवा प्रस्तुतच्या महायुद्धाच्या जगव्याळ स्वरूपाचें प्रारंभीच भविष्यज्ञान झाल्यामुळे असो, जर्मनीविरुद्ध महायुद्धाचा पुकारा होतांच ग्रेट ब्रिटननें आपल्या गोन्या वसाहतींबरोबरच काळ्या हिंदी प्रजेसहि रणदीक्षा घेण्यास पाचारण केले आणि हिंदी वीर ब्रिटिशांच्या खांद्यास खांदा लावून फ्रेंच रणभूमीवर आपला प्रताप गाजवूं लागले. रणभूमि ही सद्गुण पारखण्याची एक कसोटी असल्यानें तेथें हिंदी सैनिकांच्या अंगच्या अनेक अमूल्य गुणांची पारख झाली व हिंदी लोक पूर्णपणे कसास उतरले. ऐन आणीबाणीच्या प्रसंगी हिंदी वीरांनी जर्मनीच्या प्रग- तीस कसा प्रतिबंध केला आणि केवळ पॅरिसचें व फ्रान्सचेंच संरक्षण केले असे नव्हे, तर आधुनिक पाश्चात्य सुधारणादेवीचें त्यांनी कसे रक्षण केले हा इतिहास आतां सर्व राष्ट्रांस अवगत झालाच आहे, सबब त्याचें आम्ही पुनरुच्चारण करीत नाहीं. परंतु या आकस्मिक आघाताच्या वेळी हिदुस्थानांतील ब्रिटिश राज्यपद्धति कशी कसास लागली व तींत कोणते गुणदोष दृष्टोत्पत्तीस आले एवढेच आम्हांस तूर्त पाहावयाचे आहे. हिंदी सेना सदा सज्ज हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्ययंत्राचा पहिला मोठा गुण हा दिसून आला की, या राज्ययंत्रानें बनविलेला माल पक्क्या स्वरूपाचा असून तो तात्काल उपयोगांत आणतां येतो. युद्ध जाहीर होऊन महिना झाला नाहीं तोंच पूर्णपणे सज्ज असें सैन्य हिंदुस्थानच्या बंदरांतून बोटीवर चढूं लागले आणि महायुद्धाचा दुसरा महिना पूर्ण होण्यापूर्वीच ६ हजार मैल अंतरावर असलेल्या समरभूमीवर हिंदी वीर पुढे सरसावून अजरामर कीर्ति मिळवूं लागले. फ्रान्स आणि इंग्लंड हे दोन देश अगदी एकमेकांस चिकटलेलेच असल्यानें इंग्लंडचें सैन्य हिंदी सैन्याच्या आधी फ्रेंच रणभूमीवर अवतीर्ण झाले असल्यास नवल नाहीं. परंतु ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीचें सैन्य येऊन दाखल होण्यापूर्वी भारतीय सैन्य भारती युद्धांत नांव गाजवूं