पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खरें आहे. अर्थातच विलायतेस डेप्युटेशन पाठविणे, सरकारी स्वराज्याची योजना जाहीर झाल्यास जादा कांग्रेस भरविणे वगैरे अनेक महत्त्वाची कामे वेळच्या वेळीं उत्सुकतेनें होऊन राष्ट्रकार्याचा गाडा पुढील बारा महिन्यांत बराच मार्ग आक्रमील अशी खात्री वाटू लागली, हाहि एक यंदाच्या काँग्रेसचा विशेष होय. अपूर्व जळफळ व खळबळ यंदाच्या कांग्रेसच्या प्रातिनिधींची संख्या पांच हजारांपर्यंत गेली हा प्रकार नुसता अपूर्वच नव्हे तर कल्पनातीत होता. त्यांत स्त्रियांची संख्याच ४०० वर होती हेंहि राष्ट्रजागृतीचें अपूर्व सुचिन्हच होय. प्रतिनिधींतः नामशद्रांचाहि समा- वेश झाला होता हेंहि लक्षांत ठेवण्याजोगे आहे. अशा रीतीने ५ हजार प्रतिनिधि व ५ हजार प्रेक्षक एवढा मोठा श्रोतृसमुदाय, वक्त्यांची भाषणें आतुरतेनें व बाह्यतः शांतपणे ऐकून घेत होता. तथापि श्रोतृसमुदायाची चित्तवृत्ति पूर्वी कधींहि क्षुब्ध झाली नसेल इतकी आंतून क्षुब्ध झालेली होती. हजारों तरुणांच्या अटकबंदीनें सगळे वंगबांधव आंतून जळफळत होते. अल्लीबंध व इतर प्रमुख पुढारी अटकेंतून न सुटल्यामुळे महंमदी समाज खवळून गेलेला होता. त्यांतून महंमदअल्लींची माता आबादी बानू प्रत्यक्ष सभागृहांत हजर असून त्यांच्या समक्ष जेव्हां लो. टिळकांनी अशाच शेंकडों वीरमाता या देशांत निपजोत अशी प्रार्थना केली, त्या वेळीं तर श्रोत्यांची अंतःकरणें वीर व करुण या रसांच्या अद्भुत मिश्रणानें खळबळून गेली. त्या वेळचा अवर्णनीय अद्भुत देखावा यापूर्वी काँग्रेसच्या मंडपांत कधीच कोणीं अवलोकन केला नसेल. सारांश, कोणत्याहि बाजूनें विचार केला तरी कलकत्त्याची बत्तिसावी काँग्रेस ही केवळ औपचारिक रीत्या नव्हे, किंवा अतिशयोक्तीनें नव्हे तर खरोखरच शब्दशः शेकडों प्रकारांनी अपूर्व झाली असेंच कोणीहि मत देईल. घरीं कामधेनू पुढें ताक मागें ! [ पहिल्या जर्मन महायुद्धाच्या आणीबाणीच्या प्रसंगी ब्रिटिश सेना- पतींना सैनिकांचा तुडवडा भासूं लागला, त्या वेळीं ब्रिटिश मुत्सद्दयांनीं छोट्या वसाहतींकडे रिक्रूटांची मागणी केली. परंतु हिंदी जनतेला राजकीय हक्क देऊन व तिच्यांत आत्मीयता उत्पन्न करून हिंदुस्थानांत लष्करभरती होण्याला प्रोत्साहन दिलें नाहीं, या गैरविश्वासाच्या धोरणाला अनुलक्षून हा लेख ( केसरी, दि. ९ एप्रिल १९१८ ) .