पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलकत्त्याच्या काँग्रेसची अपूर्वता परराष्ट्रीय मुत्सद्द्यांच्या मनावर परिणाम अशा रीतीनें कलकत्याच्या काँग्रेसच्या बैठकीचे काम अत्यंत उत्साहाने व अपूर्व थाटानें फार पडले असून त्याचा ध्वनि सर्व देशभर दुमदुमून राहिला आहे. या सभेच्या अद्भुत प्रसंगी भारतमंत्र्याची स्वारी काँग्रेसला हजर राहिली असता तर शेंकडों डेप्युटेशनांनी त्यांच्या मनावर जितका परिणाम घडला असेल त्याच्या अधिक व चिरस्थायी घडला असता. परंतु तसे घडून येणें ब्युरॉक्रसीला इष्ट नस- ल्याने काँग्रेसचा ध्वनि देखील त्यांच्या कानावर जाऊं नये म्हणून त्यास कलकत्यापासून शक्य तितकें दूर ठेवण्यांत आले. परंतु काँग्रेसपुढे चाललेल्या कार्यभागांत सर्व हिंदी राष्ट्राचें आत्मिक बल एकवटले असल्याने तेथें प्रकट झालेले विचार शब्दध्वनिबरोबरच नष्ट न होतां त्यास प्राप्त झालेल्या प्रचंड अतींद्रिय शक्तीनें सातासमुद्रापलीकडच्या अंतःकरणावर देखील आपली छाप पाडूं शकतील. मग मुंबईस असलेल्या माँटेग्यु- साहेबांच्या मनावर त्यांचा पगडा बसेल यांत नवल काय ? दरसाल होणाऱ्या काँग्रेसची हकीकत रायटरनें विलायतेस पाठविलेल्या दद्दावीस वाक्यांच्या संक्षिप्त रूपानें स्टेट सेक्रटरीस कळत असते. परंतु यंदाच्या बैठकीची सविस्तर ताजी हकीकत त्यास वाचावयास मिळाली असेलच आणि तेवढ्यावरून देखील त्यास हिंदी राष्ट्राचे खरें हृद्गत कळून आले असेल. याशिवाय कलकत्याच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बेझंटबाईसारख्या त्रिखंडविख्यात व्यक्तीची स्थापना झालेली असल्याने या काँग्रेसची हकीकत युरोपांतील व अमेरिकेतीलहि पत्रांतून दरसालपेक्षां बरीच विस्ता- रानें येईल; आणि बेल्जमसारख्या चिमुकल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरितां लढणाऱ्या ब्रिटिश राष्ट्राच्या पायाखाली काय जळते आहे, याचें दोस्त राष्ट्रांस यथार्थ ज्ञान होऊन त्यांच्याकडून इंग्लंडला असा जबाब विचारला जाईल की, तुम्ही प्रशियन ब्युरॉक्रसीच्या विरुद्ध एवढे आकांडतांडव करीत आहां, पण हिंदुस्थानांत अनियंत्रित सत्ताधारी बेजबाबदार ब्युरॉकसी तुम्ही चालू ठेवतां हें कसें ? सारांश, या सालच्या काँग्रेसचा युरोपिअन व अमेरिकन मुत्सद्द्यांच्या मनावर बराच परिणाम घडेल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा आपणांस मिळेल यांत संशय नाही. १२१ बेझंटबाईस अध्यक्षस्थान दिल्याने पुढील काँग्रेसपर्यंत सर्व राष्ट्राचें धुरीणत्व त्यांजकडे साहजिकच आले आहे, आणि त्यांच्या निरलस व अश्रांत श्रम करण्याच्या पद्धतीने त्या आतां बारा महिने सतत चळवळ चालू ठेवून राष्ट्रीय सभेनें केलेल्या ठरावांची बजावणी करण्याचा विश्वप्रयत्न केल्याखेरीज राहणार नाहींत. आपल्या खात्रीचे व पसंतीचे मि. रामस्वामी अय्यर आणि पी. केशवस्वामी पिले यांची काँग्रेसच्या चिटणिसांच्या जागी नेमणूक करवून घेऊन त्यांनी पुढील कार्याांस इतक्यांतच प्रारंभ देखील केला असे म्हणावयास हरकत नाहीं; आणि या वर्षात तरी ऑ. इं. काँ. कमिटीला या बाई कांही झोपी जाऊं देणार नाहीत हे निस्संशय