पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध करण्यांत ऑल इं. काँ. कमिटी यंदाच्या सालीं आळस करणार नाही अशी आम्हांस उमेद आहे. काँग्रेसनें स्वतः पाठविण्याच्या डेप्युटेशनच्या या ठरावाशिवाय आणखी एक महत्त्वाचें कार्य काँग्रेसने केले. परंतु ते 'सहज पडे दंडवत घडे' अशांतलें असल्यामुळे त्याचे श्रेय काँग्रेसला फारसें देतां येत नाहीं. बॅ. बाप्टिस्टा हे हल्ली विलायतेंत असून त्यांनी मजूरपक्षाची सहानुभूति संपादन केली आहे व ते त्यांच्या परिषदेस हजर राहणार आहेत. त्या वेळी हिंदी स्वराज्याचा प्रश्नहि चर्चेकरितां निघेल असे आश्वासन मजूरपक्षाकडून बाप्टिस्टास मिळाले आहे. तथापि त्या सभेत बोलतांना बॅ. बाप्टिस्टा हे हिंदी स्वराज्यसंघाचे प्रतिनिधि आहेत एवढेच सांगण्यापेक्षां ते राष्ट्रीय सभेचे, अर्थात् अखिल हिंदराष्ट्राचे, प्रतिनिधि आहेत असे सांगतां आल्यास त्याचा मजूरपक्षावर अधिक परिणाम होईल हें सागणें नलगे. या- करितां बॅ. बाप्टिस्टांस सर्व राष्ट्राच्या तर्फे प्रतिनिधि निवडण्यांत यावें अशी सूचना पुढे येऊन ती सर्वसंमत झाली. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांचे कैवारी मि. पोलक यांनाहि मजूरपक्षाच्या परिषदेस प्रतिनिधि म्हणून पाठवि- ण्याचें ठरलें. मि. पोलक व बॅ. बाप्टिस्टा हे इतर निमित्ताने तिकडे आयते गेले- लेच आहेत; त्यांतच हाहि कार्यभाग साधून घ्यावा, अशा दूरदर्शी विचारानें वाहत्या गंगेत हात धुण्याचा हा पोक्त ठराव काँग्रेसने मंजूर केला ! पण ते कसोंह असो. मजूरपक्षाची जी सहानुभूति मिळत आहे तिचें या ठरावानें दृढीकरण होईल आणि बॅ. बाप्टिस्टांस यापुढे विलायतेंत कोणत्याहि समेत हिंदुराष्ट्राचा प्रतिनिधि म्हणून सर्व राष्ट्राच्या वतीनें वकिली करता येईल. परंतु एवढ्यावरच संतुष्ट न राहतां ऑ. इं. काँ. कमिटीनें यंदा तरी मि. माँटेग्यु यांच्या पाठोपाठ डेप्युटेशन पाठविण्यास बिलकूल आळस किंवा दिरंगाई करूं नये, असे आमचें आग्रहाचें सांगणे आहे. अस्पृष्ट वर्गाची सुधारणा स्वराज्याच्या ठरावाची दुरुस्ती आणि त्यास जोडलेली डेप्युटेशनची पुस्ती यांच्या योगानें काँग्रेसच्या अपूर्वतेंत मोठीच भर पडली. याशिवाय यंदाच्या काँग्रे- सचा दुसरा अंक विशेष म्हटला तर मद्रासच्या ब्राह्मणेतरांकडून व विशेषतः पंचम लोकांकडून आलेला संमतिदर्शक संदेश होय. काँग्रेसची चळवळ मूठभर ब्राह्मणांची किंवा फार तर सुशिक्षित वर्गाची आहे असे म्हणणारांस स्वराज्याच्या अर्जावरील द्वादश लक्ष सह्यांनी परभारें उत्तर दिलेच आहे. तथापि काँग्रेसच्या वेळी मद्रास इलाख्यांतून केवळ कनिष्ठ वर्गांच्या राष्ट्रभक्तांनी संदेश रवाना करण्यानें राष्ट्रीय चळवळीची पाळेमुळे शेवटल्या थरापर्यंत जाऊन पोंचली असे उघड सिद्ध झाले, आणि मद्रासचे मि. नटेसन् यांनी कनिष्ठ वर्गाचीं गान्हाणी दूर करण्याचा ठराव काँग्रेस- पुढे मांडून सुशिक्षित वर्गाची अशिक्षितांविषयींची कळकळ व्यक्त केली. काँग्रेसच्या ठरावांच्या यादींत निकृष्ट वर्गाची स्थिति सुधारण्यासंबंधाचा ठराव अपूर्वच होय. ७००