पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलकत्त्याच्या काँग्रेसची अपूर्वता ११७ नकोच. काँग्रेसकरितां मुद्दाम उभारलेला दहा हजार प्रेक्षकांचा सहज समावेश होईल एवढा भव्य दीर्घ गोलाकार मंडप प्रतिनिधींनीं व प्रेक्षकांनी फुलून गेला होता. उच्चासनावर प्रत्येक प्रांतांतील प्रतिष्ठित पुढारी झळकत होते. बंगाली युव युवतींच्या 'वंदे मातरम्' च्या कर्णमधुर आलापांनी प्रेक्षकांच्या चित्तवृत्ति तल्लीन करून सोडल्या होत्या. अशा वेळी महर्षितुल्य रवींद्रनाथांची भव्य मूर्ति पुढे आली आणि तिनें गंभीर वाणीनें राष्ट्रकार्यास स्फूर्तिदायक अशी स्वकृत प्रार्थना म्हणून दाखविली. हिंदमातेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब अशा रीतीने सर्व प्रास्ताविक विधि कल्पनातीत थाटाने पार पाडल्यानंतर बेझंटबाईची भव्य मूर्ति उभी राहून तिनें इतक्या उतारवयांतहि कायम राहिलेल्या आपल्या खणखणीत आवाजाने आपले भाषण वाचून दाखविलें. हे भाषण म्हणजे हिंदमातेच्या सर्व आकांक्षांचें प्रतिबिंबच होय. प्रस्तुत प्रसंगी हिंदराष्ट्राचें सर्व लक्ष स्वराज्याच्या प्रश्नानें आकर्षित केले असल्यामुळे अध्यक्षांच्या भाषणांतहि त्यासच प्राधान्य देण्यांत आले होते, हे वेगळे सांगावयास नकोच; परंतु त्यांच्या भाषणांतील विशेष हा की, त्यांत मिळमिळीतपणा, लेचेपेचेपणा किंवा धरसोडपणा मुळींच नसून सर्व कांहीं जाबजबाब रोखठोक होता. पाश्चात्यांच्या एककल्ली सुधार- णेचा कसा घोर परिणाम घडून येत आहे, त्यांतून जगाची सुटका करण्याचे सामर्थ्य आर्य-संस्कृतीत कसे सांठविलेले आहे, सर्व जगांत धर्माचें व शांततेचें साम्राज्य पसरण्याचें आर्यराष्ट्राचे उद्दिष्ट सिद्धीस जाण्याला हें राष्ट्र स्वयंशासित होणें किती अगत्याचें आहे, आम्ही जें स्वराज्य मागतो ते केवळ स्वार्थाकरितां, सुखाकरितां, नसून त्यांत जगाचें कल्याण कसे साधणार आहे, ब्रिटिश साम्रा- ज्याच्या बळकटीला व चिरस्थायित्वाला या देशास स्वराज्य देऊन समर्थ करणे किती आवश्यक आहे, इत्यादि प्रश्नांची सांगोपांग चर्चा करून बेझंटबाईनी आपल्या भाषणांत स्वराज्यमंदिराची रूपरेषाहि रेखाटली आहे. त्यांच्या या भाषणांत आक्षेपकांच्या सर्व आक्षेपांचें निरसन आहे, शंकितांच्या शंकांचे निराकरण आहे, विधायक टीका करा असे म्हणणाऱ्यांचेंहि समाधान होण्याजोगा विधायक भाग आहे आणि राष्ट्राची मागणी मोघम शब्दांत व गुळमुळीत भाषेत न सांगतां लखनौच्या काँग्रेसनें मंजूर केलेली योजना आतांच अमलांत आणा आणि दहा वर्षात स्वराज्याचे सर्व अधिकार स्वाधीन करण्याची तयारी करा व तशा स्वरूपाचें बिल १९१८ साली पार्लमेंटांत पास करूने, च्या, अशी स्पष्ट शब्दांत ती मागणी नमूद करण्यांत आली आहे. पारा हिंदुस्थानच्या सर्व गोलांतील लोकांस गौरवपर उत्तेजन देणारें, मिटि मुत्सद्दयींस स्वराज्य न दिव्योले, ओढवणाऱ्या भावी साम्राज्यसंकटाची इषारत देणार, आक्षेपकांच्या आक्षेपांस अवकाश राहूं न देणारें