पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करतांना 'होमरूल लीग'ची स्थापना ही एक बेझंटबाईची अलौकिक कामगिरी होय असे म्हणून होमरूल लीगचाहि गौरव केला ! हा सगळाच अपूर्व चमत्कार नव्हे काय ? सत्याग्रहरूपी सत्यनारायण पावला बेझंटबाईची अध्यक्षपदावर योजना करण्याच्या कल्पनेची परिस्फुटता होतांच कित्येकांनी अशी शंका प्रदर्शित केली होती की, या योजनेमुळे बाईच्या अज्ञात- वासाची मुदत कमी होण्याऐवजी ती उलट लांबेल; कारण हिंदी लोकमताला आपण किती तुच्छ लेखितों हे दाखविण्याकरितांच ब्युरॉकसीकडून मुद्दाम त्यांच्या अटकबंदीची मुदत बाढविण्यांत येईल! आणि ब्युरॉक्रसीच्या हड्डी स्वभावाचा व इज्जतीच्या कल्पनेचा आजपर्यंतचा अनुभव पाहतां ही शंका कांहीं अगदीच निराधार नव्हती. परंतु २५ कोटि हिंदी लोकांच्या प्रबल व तीव्र आत्मिक शक्तीनें ब्युरॉक्रसीच्या हट्टाचा अभेद्य व्यूहहि ढासळला. अकल्पित योगायोग घडून त्याच वेळी मेसापोटो- मिया प्रकरण चव्हाट्यावर आले, चेंबरलेनसाहेब अधिकारसंन्यास करून घरी बसले, त्यांच्या जागीं तरतरीत बुद्धीचे, नव्या दमाचे आणि ब्युरॉक्रसीच्या आहारी न गेलेले असे माँटेग्यूसाहेब अधिष्ठित झाले आणि त्यांच्या तोंडूनच स्वराज्यदानाचा संकल्पाहि जाहीर झाला. अशा रीतीनें हिंदी जनतेची उत्कट भक्ति पाहून सत्याग्रह- रूपी सत्यनारायण पावला. त्या योगानें इकडे ब्युरॉक्रसीचें धाबे दणाणले आणि बेझंट- बाईची अचानक मुक्तता झाली ! त्यानंतर बंगाल प्रांतांतील पुढाऱ्यांतच दुद्दी माजून यंदाची काँग्रेस कलकत्यास भरते तरी की नाही, असा एक प्रश्न पुढे येऊन पडला आणि कित्येक अधीर प्रकृतीच्या लोकांनी तेवढ्यांत पराचा कावळा करून काँग्रेसचें स्थानांतर करण्याचा आणि आपल्या मताचा नवा अध्यक्ष निवडण्याचा घाट घातला ! परंतु राष्ट्राच्या खन्या एकनिष्ट भावनेपुढे असली क्षुल्लक विघ्ने कसली टिकणार ! जेथें अधिकारारूढ ब्रिटिश ब्युरॉक्रसीचा हट्ट देखील चालला नाहीं तेथें मुंबईच्या हतबल झालेल्या ब्युरॉक्रसीचें काय चालणार! एवंच मध्यंतरींच्या सर्व संकटांचा परिहार होऊन 'यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी' या सिद्धान्ताचा सर्वोस प्रत्यय आला. अशा प्रकारें बेझंटबाईची अध्यक्षपदावर स्थापना होणें ही यंदाच्या काँग्रे- सच्या अपूर्वतेची नुसती प्रस्तावना होय. अर्थातच यापुढें जी जी गोष्ट घडून आली ती ती या प्रस्तावनेस साजेल अशीच अपूर्व थाटाची होती. प्रांताचे प्रमुख पुढारी स्वपरिवारासह कलकत्यास येऊन ता. २४ पासून एकेक दाखल होऊं लागले, आणि स्वागतमंडळाने सर्वांचा यथोचित सत्कार केला. बेझंटबाईची बारा घोड्यां- च्या रथांतून निघालेली मिरवणूक अभूतपूर्व होती. मुंबईची स्पेशल गाडी निवडक प्रतिनिधींना घेऊन आली व त्यांचें स्वागतहि तसेंच स्पेशल झाले, हे सांगावयास