पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कलकत्त्याच्या काँग्रेसची अपूर्वता ११५ करूं जाईल त्याची स्थिति नेहमींच्या अगदी उलट होईल. त्यास या काँग्रेसची अपूर्वता शोधून काढण्याला तर परिश्रम करावे लागणार नाहींतच; पण उलटपक्षी घडलेल्या सर्व अपूर्व चमत्कारांचे मी कोठवर वर्णन करूं असे म्हणूनच तो भांबा- वून जाईल. वर्णन चटकदार करण्याला त्याला तिखटमीठ लावून स्वकपोलकल्पित गोष्टी घुसडून द्याव्या लागणार नाहीत; तर आपल्या डोक्यांतील गोंधळ कमी करण्याकरितां प्रत्यक्ष घडलेल्या काही गोष्टी त्यास स्मृतिपटलावरून घालवून याव्या लागतील ! सारांश, हिंदुस्थानच्या पूर्व भागांतील पूर्वराजधानीत भरलेली ही काँग्रेस अत्यंत अपूर्व झाली यांत तिळमात्र शंका नाहीं ! या काँग्रेसच्या अपूर्वतेचें वर्णन तरी कोठवर करावें ? आज बत्तीस वर्षात अध्यक्षपदाचा मान कधी तरी स्त्री जातीच्या वांट्यास आला होता काय ? राष्ट्रीय सभेनें सभापतित्वाची माळ पुरुषवर्गातील व्यक्तींच्या गळ्यांत घालणे हे नैसर्गिक आहे. परंतु स्त्री-वर्गातील व्यक्ति सभापति होणें हा अपूर्व चमत्कार नव्हे तर काय ? बरें, बेझंटबाईची अध्यक्षपदावर योजना होण्याची कल्पना केव्हां उद्भवली व कशानें बळावली याचा विचार केला तर तिकडूनहि अचंबाच वाटतो. अधि- काऱ्यांच्या डोळ्याकडे नजर देऊन तदनुसार आपले वर्तन ठेवण्याचीच जेथें आज- पर्यंतची बहुजनसमाजाची वहिवाट तेथें सत्ताधीशांच्या रोषास पात्र झालेल्या व्यक्तीस धिटाईनें बहुमानाच्या अत्युच्च पदावर आरूढविणें ही गोष्ट बदललेल्या मनूचीच साक्ष देत नाहीं काय ? वीस वर्षांपूर्वी सरदार नातूबंधूंना निष्कारण बंदि- वास घडला असतां त्याचा निषेध करण्याचा ठराव काँग्रेसपुढे येण्यास केवढी मारा- मार पडली ! दहा वर्षांपूर्वी बेझंटबाईप्रमाणेच विनाकारण अटक झालेल्या लाला लजपतरायांस अध्यक्षस्थान देण्याची नुसती कल्पना पुढे येतांच कित्येकांच्या अंगास कसा दरदरून घाम सुटला ! या गोष्टींची स्मृति नष्ट झाली नसतां या वर्षी बेझंटबाईंच्या निवडणुकीविषयीं राष्ट्रांत इतकें ऐकमत्य व औत्सुक्य दिसून आलें, यावरून हिंदुस्थानांत राष्ट्रीय जागृति करणारी अपूर्व ज्योत पेटली आहे असेच अनुमान काढावें लागतं. बेझंटबाईची अध्यक्षस्थानी झालेली निवडणूक आणखी एका दृष्टीनेंहि मन्वंतरदर्शक असल्याचे दिसून येतें. दोन वर्षांपूर्वी मुंबईस कांग्रेस- च्या बैठकीच्या वेळी बेझंटबाईनें 'होमरूल लीग' स्थापण्याचा आपला विचार राष्ट्रसभाभक्तांस कितपत रुचतो हें उगीच खडा टाकून पाहिलें; पण तेवढ्या एका खड्यानें राष्ट्रसभेच्या भक्तांच्या चित्तवृत्तीत एवढा गोंधळ उडवून दिला की, होमरूल लीग ही काँग्रेसची निस्सीम साह्यकर्ती असतां काँग्रेसद्वेष्टयांनी काँग्रेसचा घात करण्याकरितां ही दुसरी सवत निर्माण केली असे प्रलाप कित्येकांच्या तोंडून निघू लागले. परंतु ५२ दुगणी .१०४ आठवडे गेले नाहीत तोच 'सवत' मानल्या गेलेल्या होमरूल लीगच्या प्रवर्तक बेझंटबाई एकमतानें काँग्रेसच्या अध्यक्षपदारूढ झाल्या आणि त्यांच्या निवडणुकीस प्रारंभी विरोध करणाऱ्या सुरेंद्रबाबूंनी त्यांस