पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कत न करतां 'आलिया भोगासी असावें सादर' या न्यायानें उलट सदर अधि- कारी-वर्गच अशा प्रकारच्या मागणीस अनुकूल होऊन त्याप्रमाणे स्वतः अंमल कर- ण्यास तयार होईल. आम्ही सांगतों हें कांहीं मनोराज्य नव्हे, ही गोष्ट होणारी आहे व होईल, धैर्य धरून नेटानें व एकजुटीने आम्ही आपला उद्योग मात्र केला पाहिजे, आणि असा उद्योग झाला म्हणजे आम्हांस हाणून पाडण्याकरितां केलेले प्रयत्न आमच्या फायद्याचे कसे होतात याचें आज एक प्रत्यक्ष उदाहरण आमच्या डोळ्यापुढे आहे. कलकत्त्याच्या काँग्रेसची अपूर्वता [ कलकत्ता शहरीं १९१७ च्या नाताळांत काँग्रेसची जी बैठक श्रीमती बेझंटबाईंच्या अध्यक्षतेखाली झाली त्या बैठकींतील अपूर्वतेचें वर्णन या लेखांत आलेले आहे. १९१६ सालच्या लखनौच्या अधिवेशनांत 'कॉंग्रेस-लीग पॅक्ट ' मंजूर करून घेण्याचा जो डाव लो. टिळकांनीं अति कुशलतेनें व मुत्सद्देगिरीनें साधला त्यामुळे स्वराज्याची मागणी एकजुटीनें करण्याचा मार्ग मोकळा होऊन चळवळीला कल्पनातीत जोर चढला. ही होमरूल लीगची चळवळ दडपून टाकण्यासाठी मद्रास सरकारनें बेझंटबाईना स्थानबद्ध केलें. परंतु लोकमताच्या प्रभावापुढे सरकारला हार खावी लागली व बेझंटबाईच काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. या अपूर्व घटनेचें वर्णन या लेखांत आलेलें आहे. ] बदललेल्या मनूची साक्ष मनुष्यप्राणी निसर्गतः काव्यलोलुप आहे आणि काव्याची तर सगळी मदार अतिशयोक्तीवर; यामुळे सहजगत्याच मनुष्याची अतिशयोक्तीकडे असलेली प्रवृत्ति हरहमेश घडणाऱ्या रोजच्या व्यवहारांत देखील दृष्टोत्पत्तीस येते. दरसाल हिवाळा किंवा उन्हाळा येतो व जातो; पण प्रत्येक वर्षी यंदाइतकी कडक थंडी कधी पडली नव्हती, अथवा इतका असह्य उष्मा कधी झाला नव्हता, हें सर्टिफिकीट त्याला आपलें दरसाल ठेवलेलेच ! तोच न्याय काँग्रेससारख्या समारंभांनाहि लागू होतो. ! सालोसाल काँग्रेसच्या बैठकीत कांहीं तरी नावीन्य कसेंबसें तरी शोधून काढावें आणि अशी काँग्रेस यापूर्वी कधीं झाली नव्हती असा शिक्का ठोकून द्यावा, की झाले त्यांच्या मनाचें समाधान ! परंतु यंदाच्या बत्तिसाव्या काँग्रेसचें जो कोणी वर्णन ( केसरी, दि. १ जानेवारी १९१८ )