पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करायला गेला एक, झालें भलतेंच ११३ व्यक्त केला आहे. पायोनियरसारख्या अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रकर्त्यांनी या कृत्याबद्दल लॉर्डसाहेबांचें अभिनंदन केले असल्यास यांत कांहीं नवल नाहीं. गुळाचा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य. पण त्यांतल्या त्यांतहि कित्येकांस लाज वाटून ते " जुलूम केलात हें ठीक झाले, पण कांहीं हक्क देण्याचें तरी जाहीर करा " असे म्हणू लागले आहेत हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे. वेळ मोठ्या आणीबाणीची आहे. महायुद्धानंतर साम्राज्याची जी पुनर्घटना होणार त्यांत स्वराज्यवाद्यांचा जय होऊन ब्युरॉक्सीस म्हणजे अधिकारीवर्गाच्या सत्तेस उतरती कळा लागते, किंवा स्वराज्यवाद्यांचा पूर्ण नायनाट होऊन अधिकारी वर्गाची अनियंत्रित सत्ता हिंदुस्थानांत पुनः शेंकडों वर्षे तोऱ्याने नाचत राहते, हे ठरण्याची आतां वेळ आलेली आहे. धैर्यानें व जुटीनें चळवळ चालवा ? लॉर्ड पेंटलंड यांच्या भेडसावण्याला भिऊन हिंदुस्थानांतील लोक जर यां वेळी गप्प बसतील तर घात झाला म्हणून समजा; आणि आमचा घात म्हणजे ब्युरॉक्रसीचा जय होय ! युरोपांतील महायुद्धांत जर्मनीविरुद्ध एक- वटलेली सर्व राष्ट्र आपण सर्व देशांत स्वतंत्रता व स्वराज्य प्राप्त करून देण्याकरितां झटत आहोत असे कंठरवानें जगास सांगत आहेत; मग हिंदुस्थाननेंच काय म्हणून मागें राहावें ! लॉर्ड पेंटलंड कांहींहि म्हणोत; आज हिंदुस्थानास स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ आली आहे हे निश्चित होय. पण स्वराज्याचें हें जांभूळ अचानक तुमच्या तोंडांत पडेल असे समजूं नका, किंबहुना हें जांभूळ तुमच्या तोंडांत दीर्घकाल पर्यंत - कांहीं शतकेंपर्यंत- अर्थात, बहुतेक केव्हांहि पडूं नये अशी येथील तुमच्यावर अनियंत्रित अधिकार चालविणाऱ्या वर्गाची इच्छा आहे; व त्यासाठी तें काय करण्यास तयार आहेत याचा पूर्वी जरी कित्येकांस संशय असला तरी तो संशय दूर करण्याचें श्रेय मोठ्या धैर्याने आणि धाडसानें लॉर्ड पेंटलंड यांनी घेतलेले आहे. लॉर्ड पेंटलंड यांच्या या अविचारी कृत्यानें स्वराज्य प्राप्त करून घेण्याबद्दलच्या आस्थेची, कळ- कळीची आणि निश्चयाची जी लाट आज हिंदुस्थानभर पसरलेली आहे तीच दृढतर व चिरस्थायी करून स्वराज्याचे हक्क मिळेपर्यंत ती तशीच कायम ठेवणे हे या वेळेचें आपले कर्तव्य होय. आणि ते मोठ्या उत्साहानें, नेटानें आणि धैर्याने कोणत्याहि प्रकारचा मतभेद न ठेवतां केवळ मातृभूमीच्या उद्धाराकडे लक्ष देऊन सर्वांनी पार पाडावें अशी त्यास आमची प्रार्थना आहे. झालें हें कांहींच नाहीं. स्वराज्य- संघाचे सभासद हजारांनी नव्हे लक्षांनी मोजण्याइतके झाले पाहिजेत, आणि या लक्षावधि लोकांची हाकाटी व ओरड सहा हजार मैलांवर पोंचून तिनें विलायतेस इतका कल्लोळ उडवून दिला पाहिजे की, त्यामुळे येथें अनियंत्रित सत्ता चालवि- णाऱ्या अधिकारी-वर्गास लाज वाटून हिंदुस्थानांतील प्रजेच्या न्याय्य मागणीस हर- 2