पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध वर्तमानपत्रांत येऊ लागल्या; भारतसंरक्षक सैन्यांत भरती करण्यासाठी जे लोक खटपट करणार होते त्यांनी उघडपणे ती बंद करण्याचें ठरविले; पेटलंडसाहेबांना घरी परत बोलवा म्हणून विलायतेस तारा झाल्या; आणि सि. बमनजी या एकट्या गृहस्थानेच स्वराज्याची चळवळ नेटाने चालविण्यास लाख रुपये देण्याचें अभिवचन दिले. सर्व हिंदुस्थानभर सर्व पक्षांत, सर्व जातींत आणि सर्व प्रांतांत अशा प्रकारची चळवळ ज्या पेंटलंडसाहेबांच्या एका हुकुमानें व एका भाषणाने झाली, त्यांस हिंदुस्थानचे हितकर्ते म्हणावें की शत्रु म्हणावें याचा क्षणभर तरी संशय पडल्याखेरीज राहात नाहीं. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करून हिंदुस्थानांतील लोकमत जसे क्षुब्ध केले, तशीच पण त्यापेक्षांहि विशेष महत्त्वाची गोष्ट लॉर्ड पेटलंड यांच्या हातून घडून आली आहे. करावयाला गेला एक आणि झाले भलतेच ! बेझंटबाईस दोन सामोपचाराच्या गोष्टी सांगून किंवा दुसऱ्या कांहीं अपरोक्ष रीतीने घेरून स्वराज्याची चळवळ नरम पाडण्याचा जर लॉर्ड पेटलंड यांनी उद्योग केला असता, तर आज सर्व हिंदुस्थानभर स्वराज्याच्या चळवळीने चोहोंकडे जशी उचल खाली आहे व स्वराज्याच्या प्राप्तीप्रीत्यर्थ सर्व लोकांत एकजुटीनें उद्योग करण्याची जी उत्कंठा उत्पन्न झाली आहे ती झाली असती काय ? अलाहाबादचे मदन मोहन, कलकत्याचे सुरेंद्रनाथ, मुंबईचे जिना, सिंधचे ना. भुर्ती वगैरे जे सन्माननीय हिंदु व मुसलमान गृहस्थ “मी स्वराज्यवादी आहे, मी स्वराज्यवादी आहे, कांहीं होवो मी स्वराज्याकरितां उद्योग करणार म्हणून अहमहमिकेनें आज पुढे आले आहेत व येत आहेत ते कशामुळे? हिंदुस्थानांतील लोकांस स्वराज्याची प्राप्ति करून देण्यासाठी हातांत कंकण घातलेल्या मनोभावेंकरून त्यासाठी निल झटणाऱ्या बेझंटबाईचा छळ झाला म्हणून ना? ज्या छळापासून अशा प्रकारचा परिणाम होतो तो छळ भोगणे फारच थोड्या लोकांच्या नशिबी येत असते; आणि राज्यकर्ते या नात्यानें बेझटबाईचा अशा प्रकारचा छळ करून लॉर्ड पेंटलंड यांनी बायबलांतील पायलटची कीर्ति संपादन केली आहे असे आम्हांस वाटते. ख्रिस्ताची ज्या वेळेला रोमन गव्हर्नर पायलट याच्यापुढे चवकशी झाली त्या वेळी लिस्ताने भी सत्यासाठी झटणार असें सांगिल्यावर "सत्य म्हणजे काय " असे पायलटच्या तोंडून उद्गार निघाल्याचें नव्या करारांत म्हटले आहे. लॉर्ड पेटलंड व बेझंटबाई यांच्यामधील संवाद अशाच प्रकारचा आहे. स्वराज्य म्हणजे काय, काँग्रेसने त्या बाबतीत काय ठराव केला आहे वगैरे गोष्टी लॉर्डसाहेबांस बेशंटबाई, समजून देत असतां “हे मला नको, याची चर्चा मी करीत नाहीं. " अशा प्रकारची लॉर्ड पेटलंड यांनी उत्तरे दिली आहेत; आणि बाईची चळवळ साम्राज्याला विघातक ठरवून जो कायदा साम्राज्याशी बेहमान होणाऱ्या लोकांकरितांच लागू करावयाचा लावा बेझंटबाईवर अंमल करून आपली नीति व शहाणपणा जगास "