पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करायला गेला एक, झालें भलतंच खरीखुरी पहिली पायरी युद्धानंतर विशेषशी कटकट न करता सरकार आपण होऊनच आम्हांस देईल, अशी आमच्याकडे बऱ्याच लोकांना आशा वाटत होती. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनें विलायतेस मेअखेर काँग्रेसचें डेप्युटेशन जावें असें ठरविलें असतां तें अद्यापहि गेलें नाहीं, यांतील मर्म हेंच होय. आणि ठरल्या- प्रमाणें तें गेलें असतें तर कदाचित् स्वराज्याच्या चळवळीवर आलेला आजचा प्रसंगहि टळला असता; पण होणारी गोष्ट टळणार कशी? परमेश्वराच्या मनांतूनच स्वराज्याच्या चळवळीचा जोर कसास लावून त्याची शक्ति राज्यकर्ते आणि प्रजा या दोघांच्याहि निदर्शनास आणून द्यावयाची होती. म्हणून स्वराज्याची चळ- वळ हाणून पाडण्याच्या येथील अधिकारीवर्गाच्या मनांत धुमसत असलेल्या इच्छेस मद्रासमध्ये एकाएकी तोंड फुटून तिनें मद्रासलाच काय तर सर्व हिंदुस्थानभर गोंधळ उडवून दिला आहे. चळवळीस जोर चढला लॉर्ड पेंटलंड यांस अशी उमेद होती कीं, हिंदुस्थानांत पुनः मवाळ- जहालांत फूट पडून सरकारची बाजू समर्थन करणारे कांहीं तरी कायदे- कौन्सिलचे त्यांच्या मतें समंजस सभासद त्यांस येऊन मिळतील. पण होमरूलचें दैव असें कांहीं विचित्र आहे की, त्यामुळे बेझंटबाईवर झडप घातल्यानें अधिकारी- वर्गाला इष्ट तो परिणाम न होतां उलट होमरूलच्या चळवळींत किती जोर आहे हे त्यामुळे अधिकाधिकच व्यक्त होत चालले आहे. दुसरीकडे दिलेल्या हकीकती- वरून वाचकांस कळून येईल की, गेल्या आठवड्यांत हजारों लोकांच्या तोंडून पेंटलंडच्या कृतीचा आणि समजुतीचा जोरानें तीव्र निषेध झाला, आणि आजपर्यंत स्वराज्यसंघांत उदासीनतेनें सामील न झालेले असे शेंकडों नामांकित गृहस्थ स्वराज्यसंघाचे भराभर सभासद झाले व होत आहेत. मवाळ आणि जहाल हा भेद नाहींसा झाला; अलाहाबादेतील प्रमुख लोकांचा नवीन स्वराज्यसंघ स्थापन झाला; कलकत्यास सर्व बंगालप्रांतभर स्वराज्याची चळवळ करण्याचे ठरलें; लखनौ येथील मुसलमान लोकांच्या सभेनें पेंटलंडसाहेबांच्या कृत्याचा पूर्ण निषेध करून बेझंटबाईशी आपली सहानुभूति व्यक्त केली; कायदेकौन्सिलचे सभासद, बॅरि- स्टर, वकील वगैरे दरएक प्रांतांत अनेक गृहस्थ - जे इतक्या लवकर तरी स्वराज्य- संघास येऊन मिळाले नसते ते होमरूल लीगचे सभासद होऊं लागले; सरकार विरुद्ध झालें तरी हरकत नाहीं, आम्ही स्वराज्याच्या प्राप्तीकरितां पूर्ण निश्चयानें खटपट करणार, मागें घेणार नाही, असा आपला कृतसंकल्प शेंकडों हजारों लोकांनी जाहीर केला; स्वदेशी व बहिष्कार यांच्या शपथेचा पुनरुच्चार होऊं लागला; सरकारच्या कृत्याबद्दल नाखुषी दाखविण्याकरितां कायदेकौन्सिलांतील लोकांनी आपल्या जागा सोडाव्या अशा सूचना 'ट्रिब्यून'सारख्या प्रतिष्ठित