पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध दडपशाहीचीं पूर्वचिन्हें नशीब बलवत्तर असले म्हणजे कोणी अपकार करावयास लागला तरीहि तो उलट उपकार होतो. 'विषमप्यमृतं क्वचिद्भवेदमृतं वा विषमीश्वरेच्छया ' •अशी जी एक जुनी म्हण आहे तिचा प्रत्यय गेल्या आठवड्यांत मिसेस बेझंटबाईस व त्यांच्या दोन साथीदारांस मद्रास सरकारने अन्यायाची अटक केल्यामुळे सर्व हिंदु- स्थानभर जी खळबळ उडून गेली तीवरून चांगला नजरेस येतो. स्वराज्य किंवा होमरूल, मग तें राष्ट्रीय सभेनें आणि मुस्लिम लीगनें मंजूर केलेले असो वा दुसरे कोणतेंहि असो, आमच्या येथील अधिकारीवर्गास कवच प्रिय होण्याचा संभव नव्हता व नाहीं. कांहीं कांहीं अधिकारी यांस अपवाद म्हणून सांपडतील; पण सामान्यतः पाहिले तर आपल्या हातांतील अनियंत्रित सत्ता गमावण्यास कोणीहि झाला तरी नाखूषच असणार, आणि गमावण्याची वेळ आल्यास ती टाळण्यास किंवा निदानपक्षी आजचें मरण उद्यांवर ढकलण्यास कधींहि मागे घेणार नाही. किंबहुना हा मनुष्यस्वभावच आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं, व अशा दृष्टीने विचार करतां लॉर्ड पेटलंड यांस त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल नांव ठेवण्याचीहि जरूर नाही. लॉर्ड पेटलंडच काय पण लॉर्ड चेल्म्सफर्ड आणि मि. चेंबरलेन हे वस्तुतः पाहतां हिंदुस्थानांतील अनियंत्रित सनदी अधिकारीवर्गाचे म्होरके होत, आणि या नात्याने त्यांनी एवढा वेळपर्यंत होमरूलचें बोलणें व चळवळ चालू दिली हेंच थोडें- बहुत भाश्चर्य म्हणावयाचें ! कसेंहि असो; स्वराज्यासंबंधाने येथील अधिकारीवर्ग आणि त्यांच्यातर्फे बोलणारे गव्हर्नर, गव्हर्नर-जनरल किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट हे यापुढे काय धोरण स्वीकारणार हैं मिसेस बेझंटबाईची जी संभावना झाली ती- वरून आतां सर्व लोकांस कळून चुकले आहे. स्वराज्य हे हिंदुस्थानांतील राज्य- व्यवस्थेचें अंतिम ध्येय आहे असे तोंडानें गोड गोड बोलून अपात्रतेच्या सबबीवर या स्वराज्याचा पहिला हप्तादेखील हिंदुस्थानांतील लोकांस यावयाचा नाही, असाच येथील अधिकारीवर्गाचा म्हणजे अर्थात् त्याबरोबरच गव्हर्नर जनरल आणि सेके- -टरी ऑफ स्टेट यांचा, संकल्प झालेला दिसतो. हा संकल्प लखनौच्या राष्ट्रीय सभे- नंतर लवकरच जाहीर व्हावयाचा. पण मध्ये कर्टिसप्रकरण निघालें व महायुद्धासाठी हिंदुस्थानांत कर्ज उभारून सैन्याचीहि भरती करावयाची होती, तथापि यांतल्या त्यांत मुंबई इलाख्यांत टिळकांवर फिर्याद होऊन मुंबई व मध्यप्रांत यांत येण्याची बेझंटबाईस मनाई झाली; आणि टिळक व पाल यांनी पंजाबांत येऊं नये म्हणून राज्यरक्षणकायद्याखालीं हुकूम सुटले. पुढे वारा कसा वाहणार याची ही पूर्व- चिन्हेंच होती म्हटले तरी चालेल. पण विलायतेंत महायुद्धासंबंधानें बोलतांना प्रमुख मुत्सद्दयांनी वेळोवेळी काढलेले उद्गार वाचून व आयर्लंडास स्वराज्य देण्यासंबंधाने तिकडे जी चळवळ चालू आहे ती पाहून, हिंदुस्थानांत स्वराज्याची चळवळ बेकायदेशीर मानली जाणार नाही, आणि निकृष्ट का होईना पण स्वराज्याची ११०